नाशिक

दारूसाठी पैसे न दिल्याने आईचा खून; मुलगा पोलिसांच्या ताब्यात

सिडको : प्रतिनिधी
दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मुलाने आईवर धारदार हत्याराने हल्ला केल्याने आईचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमाननगर परिसरात सोमवारी मध्यरात्री घडली. कमलाबाई अनाजी वळवी (वय 65) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संशयित मुलगा तानाजी वळवी (वय 40) याला गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमाननगर परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कमलाबाई वळवी यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती डायल 112 वरून मिळताच गंगापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
संशयित तानाजी वळवी याला दारूचे व्यसन असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. दारूसाठी पैसे न दिल्याने हा हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण काय होते आणि घटनेपूर्वी आई-मुलामध्ये काही वाद झाला होता का, याचा तपास पोलीस करीत आहेत. पोलिसांनी संशयित तानाजी वळवी याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे.

Mother murdered for refusing money for alcohol; son in police custody.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

10 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

10 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

10 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

10 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

10 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

10 hours ago