नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील ’ऑपरेशन टायगर’च्या राजकीय घडामोडींमध्ये निष्ठेची भूमिका घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे शुक्रवारी (दि. 19) सकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि फुलांच्या वर्षावात झालेल्या या स्वागताने परिसर शिवसेनामय झाला
होता.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील आमदारांनंतर खासदारांमध्येही मोठी फूट पडल्याची चर्चा सुरू असताना ऑपरेशन टायगरअंतर्गत ठाकरे गटातील नऊपैकी सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याचे समोर आले.
या पार्श्वभूमीवर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेशी आपली एकनिष्ठता कायम ठेवली. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचे शिवसैनिक आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार भास्कर भगरे, शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, प्रथमेश गिते, भारती ताजनपुरे, वैशाली दाणी, मंगल आढाव, योगेश भोर, संजीवनी हंडोरे, रुचिरा साळवे, माजी नगरसेवक संतोष साळवे, निवृत्ती जाधव, योगिता गायकवाड, विकास गिते, भय्या मणियार, किरण डहाळे, चंदू महानुभाव, राजू मोरे, योगेश देशमुख, अनिल गायखे , अश्विन पवार, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर खासदार राजाभाऊ वाजे यांचे झालेले हे भव्य स्वागत पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील राजकीय घडामोडींमध्ये व्यस्त असलेले खासदार राजाभाऊ वाजे राजधानी एक्स्प्रेसने नाशिकरोड येथे दाखल होताच शिवसैनिकांनी घोषणांनी रेल्वेस्थानक परिसर दणाणून सोडला. ‘राजाभाऊ वाजे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं‘, ‘उद्धव ठाकरे जिंदाबाद‘ आणि ‘शिवसेनेचा विजय असो,‘ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
MP Rajabhau Waje accorded a rousing welcome at Nashik Road Railway Station.
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…