मंदिर संस्थानांचा कुंभमेळा प्राधिकरणासोबत पुढाकार
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने पार पाडण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने निर्माल्य व्यवस्थापनासाठी व्यापक आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे.
मंदिरांमध्ये जमा होणार्या निर्माल्याचे स्वतंत्र संकलन, वैज्ञानिक प्रक्रिया आणि त्यापासून उपयुक्त उत्पादने निर्मितीसाठी मंदिर संस्थाने, शासकीय यंत्रणा आणि निर्माल्य प्रक्रिया संस्थांच्या समन्वयातून कायमस्वरूपी व्यवस्था उभारण्यात येणार आहे.
यासंदर्भात कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस विविध मंदिर संस्थानांचे प्रतिनिधी, पुरोहित संघटनांचे पदाधिकारी, नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगर परिषद, जिल्हा परिषद तसेच निर्माल्य प्रक्रिया क्षेत्रात कार्यरत संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत मंदिर स्तरावर निर्माल्याचे वर्गीकरण करून स्वतंत्र संकलन केंद्रे उभारणे, गोदावरी नदी व इतर जलस्रोतांमध्ये निर्माल्य जाणे रोखणे व त्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक यंत्रणा विकसित करण्याबाबत चर्चा झाली. नियमित संकलन व्यवस्था निर्माण करून निर्माल्यापासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यावर भर देण्यात
आला.
कुंभमेळा प्राधिकरण समन्वय, आवश्यक परवानग्या आणि अंमलबजावणीवर देखरेख करणार आहे. मंदिर संस्थाने निर्माल्याचे वर्गीकरण, जनजागृती आणि संकलनासाठी जागा उपलब्ध करून देणार आहेत.
प्रक्रिया संस्था संकलन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धित उत्पादन निर्मितीची जबाबदारी पार पाडतील.सिंहस्थ कुंभमेळा ही केवळ आयोजनाची नव्हे, तर लोकसहभागातून कायमस्वरूपी शाश्वत व्यवस्था निर्माण करण्याची संधी आहे. मंदिर संस्थाने या उपक्रमातील महत्त्वाच्या भागीदार आहेत. भाविकांनी अर्पण केलेल्या निर्माल्याचे व्यवस्थापनही तितक्याच जबाबदारीने होणे आवश्यक आहे, असे कुंभमेळा प्राधिकरण शेखर सिंह म्हणाले.
वेस्ट टू वेल्थमधून रोजगाराच्या संधी
निर्माल्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत, अगरबत्ती तसेच इतर पर्यावरणपूरक उत्पादने तयार करण्याच्या विविध पर्यायांवर बैठकीत चर्चा झाली. या उपक्रमातून महिला बचतगट आणि स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. पर्यावरणसंवर्धन, लोकसहभाग आणि रोजगारनिर्मिती यांचा समन्वय साधत सिंहस्थापूर्वी निर्माल्य व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल उभारण्याचा कुंभमेळा प्राधिकरणाचा प्रयत्न आहे.
Plan for the management of ritual offerings (nirmalya) ahead of Simhastha.
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…