ऑल राऊंडर बेस्ट कॅडेट : गणेश चव्हाण
गणेश चव्हाण पोलीस उपनिरीक्षक सर्वात जास्त गुण मिळवलेले प्रशिक्षणार्थी मानाचे रिव्हॉल्वर आणि चषक मिळालेले गणेश चव्हाण हे सोलापूर जिल्ह्यातील अनगर या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण झाले आहे पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन कुटुंबातील अत्यंत बिकट परिस्थिती पाहून नोकरी करण्याचा निर्णय घेतला. राज्य राखीव दल यामध्ये मी 2009 मध्ये प्रवेश घेतला यानंतर अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले इयत्ता चौथी पासून पहिला क्रमांक कधी सोडला नाही एमपीएससी मधून पीएसआय झालो महाराष्ट्र पोलीस कॅडमी मध्ये आल्यानंतर मनामध्ये जिद्द होती की सर्वाधिक गुण मिळविला आणि चिकाटीने जास्त अभ्यास करून प्रथम क्रमांक मिळवेल. आज मिळालेले यश हे आई-वडील पत्नी बहीण आदींच्या आशीर्वादाने मला प्राप्त झाले आहे . आल्यानंतर दहा महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये कायद्याच्या जे मला ज्ञान मिळालेला आहे हे समाजाच्या चांगल्या कामासाठी त्याचा वापर करेल असे गणेश चव्हाण यांनी सांगितले.
ऑल राऊंड वुमन कॅडेट ऑफ द बॅच : तेजश्री म्हैसाळे
पिंपरी चिंचवड येथे सध्या कार्यरत असलेल्या तेजश्री म्हैसाळे यांना सेवेत 11 वर्ष झाले असून घरची सामान्य परिस्थिती. शेती आणि छोटे कुटुंब असा परिवार आहे. पती बिझनेसमन आणि पाच वर्षाचा मुलगा आहे. या क्षेत्रात येण्याचे निश्चित केलेले नव्हते मैत्रिणींच्या सहवासामुळे मी सहज भरती झाले. सेवा बजावत असताना सर्वजण पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षेची तयारी करत होते. त्यामुळे माझ्याही मनात परीक्षा द्यावी असा विचार आला त्यानुसार मी माझी कार्यपद्धती ठरवून अभ्यासास सुरुवात केली अधिकारी म्हणून आपण निर्णय घेऊन काम करू शकतो हे माहिती असल्याने त्या दृष्टीने अभ्यास सुरू केला. महिलांसाठी हे क्षेत्र जरी कसोटीचे असले तरी महिलांमध्ये चिकाटी जिद्द असल्याने त्या नक्कीच यशस्वी होऊ शकतात त्यामुळे या क्षेत्रात येऊन देश आणि समाजासाठी नक्की चांगलं काही करू शकतो महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आपण चांगले प्रयत्न करू शकतो.
आई वडिलांच्या कष्टांचे झाले चिझ ; मुलगा झाला पोलिस निरीक्षक
नवनियुक्त पोलिस निरीक्षक अखतर सत्तार शेख यांचा प्रेरदायी प्रवास
आई -वडिल कष्ट करायचे… घरची परिस्थिती तशी बेताचीच… आपण काही तरी करायला पाहिजे… आई वडिलांच्या कष्टाचे चीज झालेच पाहिजे… या ध्येयाने पेटून उठलो… दिवसरात्र मेहनत केली. आई -वडिलांच्या वाट्याला जे आले ते आपल्या वाट्याला येऊ नये… म्हणून पोलीस उपनिरीक्षक होऊन आई वडिलांची…देशाची सेवा करायची… या ध्येयातून आज पोलीस उपनिरीक्षकापर्यंत पोहोचलो.. अशा भावना अखतर सत्तार शेख यांनी व्यक्त केल्या.
बुलढाणा जिल्हयातील छोट्याशा गावी जन्मलेल्या अख्तर सत्तार शेख यांचे बालपण हलाखीतच गेले. आई वडिल मोलमजुरी करत कुटुंबाचा उदनिर्वाह करत होते. घरातील ही कष्टमय परिस्थिती पाहत मोठ्या झालेल्या अखतर यांनी काही तरी करून दाखवण्याची खूणगाठ मनाशी बांधली. त्या जिद्दीने दहावीपर्यंतचे शिक्षण अमरावती येथे घेतले. डोणगांव या बुलढाणा जिल्हयातील छोट्याशा गावी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बुलढाण्याला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर बुलढाणा येथे पोलिसदलात रूजू झाले. दहा वर्ष पोलिसदलात कार्यरत असलेल्या अखतर यांच्या मनात असलेले स्वप्न शांत बसू देत नव्हते. त्यांनी पुन्हा स्वप्नांचा पाठलाग करण्याचे ठरवले आणि 2017 साली झालेल्या पोलिस दलातील विभागीय स्पर्धा परीक्षेत 110 वा क्रमांक मिळवत ध्येय आणि चिकाटीच्या बळावर यश संपादन केले. त्यांनतर 2021 पासून महाराष्ट्र पोलिस अकॅडमी येथे खडतर असे प्रशिक्षण घेत 119 व्या सत्राच्या दीक्षांत सोहळ्यात पदग्रहण करत स्वप्नांना सत्यात उतरवले. त्यांना अमरावती परिमंडलात नियुक्ती मिळाली आहे. पोलिस निरीक्षक अखतर शेख यांचा प्रवास प्रत्येक तरुणांसाठी प्रेरणादायी असाच आहे. ते सांगतात की आजची तरूणाई जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर घालवते.हीच बाब ध्येयप्राप्तीच्या प्रवासात अडथळा ठरत आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना तरूणाईनी स्वत:वर वेळेचे बंधने घालत यश प्राप्त करायला हवे असे मत अखतर सत्तार शेख यांनी व्यक्त केले.
ठरवले… साहेबच व्हायचे!
पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. मर्यादित अधिकार त्यामुळे मनाशी ठरविले. काहींही झाले तरी साहेब व्हायचेच. आणि तयारीला लागले. लग्नानंतर प्रपंच मागे होता. मुलांचेही पालन पोषणाची जबाबदारी खांद्यावर होती. पण साहेब होण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. आज तो दिन प्रत्यक्षात उतरला. आणि मी घेतलेल्या कष्टाचे… पाहिलेल्या स्वप्नांचे खर्या अर्थाने चीज झाल्याचे समाधान आहे… हे उदगार आहेत श्रीदेवी बगे यांचे.
119 व्या तुकडीचा दीक्षान्त समारंभ सोहळा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे आयोजित करण्यात आला होता. या 322 पोलीस उपनिरीक्षकमध्ये बारा महिलांचाही समावेश होता. त्यात श्रीदेवी बगे यांचाही समावेश आहे.पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर होता. परंतु सर्वांची साथ आणि सहकार्य मिळाल्यामुळे मी हा पल्ला गाठू शकले. बारावीनंतर पोलिस होण्याचा निर्णय घेतला. शिराडोन येथे शिक्षण घेतले. लातूर जिल्हा पोलिस दलात भरती झाल्यानंतर 2017 मध्ये परीक्षा दिली. भरतीनंतर लग्न झालं. कुटुंबातील जबाबदारी मुलांची जबाबदारी सांभाळत आतापर्यंतचा प्रवास केला. यामध्ये सर्वांनी मला पाठिंबा दिला दोन्ही कुटुंबातील तसेच मित्र-मैत्रिणी या सर्वांचा मला पाठिंबा मिळाला. चिकाटीने अभ्यास केला कॉन्स्टेबल असल्याने आपल्याकडे कोणतेच अधिकार नव्हते. याचा विचार करून अधिकारी म्हणून ज्या वेळेला आपण समाजातील सर्व दुर्बल घटकांसाठी निर्णय घेऊन काहीही करू शकू याचा विचार केल्याने या प्रशिक्षणास मी देण्याचा निर्णय घेतला. आता मला प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नांदेड परिक्षेत्रात पोस्टिंग झाली आहे.
जिद्द बाळगली.. अन् उपनिरीक्षक झाले!
एक गृहिणी काय करु शकते… याचा प्रत्यय संजिवनी तोडकर या महिला उपनिरीक्षकाच्या प्रवासाकडे पाहिल्यावर येतो. कुटुंबाची साथ.. मुलांचे पाठबळ.. यामुळे आज पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालता आली. असे उपनिरीक्षक संजीवनी तोडकर यांनी सांगितले.
322 पोलीस उपनिरीक्षकांमधील बारा महिलांपैकी एक अत्यंत खडतर अशा प्रशिक्षणामध्ये यशस्वी होऊन आधुनिक भारतात महिला कुठेही कमी नाही ही सेवा आत्मविश्वास देते. स्वतःची आणि इतरांची सुरक्षेची शाश्वती मिळते यामुळे महिलांनी जास्तीत जास्त या क्षेत्रात यावे पोलिसाची नोकरी म्हणजे 24 तास ड्यूटी किंवा मानसिक शारीरिक त्रास असे गैरसमज दूर करून या क्षेत्रात देशसेवा करण्यासाठी खूप मोठी संधी आहे. त्यामुळे उच्च दर्जाची सेवा करण्यास मिळते तसेच पोलिस हा अगदी गणपतीच्या मिरवणुकीत पासून नैसर्गिक आपत्ती असो जन्म-मृत्यू प्रत्येक क्षणी तुमच्या मदतीसाठी तत्पर असतो त्यामुळे आपणही याचा एक भाग झाल्यामुळे जनसेवा करण्यास आनंद मिळतो प्रशिक्षण घेत असताना अनंत अडचणींचा डोंगर पार करून यशस्वीरित्या पुढची वाटचाल करण्यामध्ये दोन्हीकडील कुटुंब आणि मुलांचा पाठिंबा आणि चिकाटी जिद्द असल्याने आतापर्यंतचा प्रवास सुकर झाला आहे
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…