नाशिक

मांजरांसाठी निर्बीजीकरण केंद्राला मनपाची मंजुरी

भटक्या प्राण्यांच्या समस्येवर नियंत्रणासाठी मनपाचे पाऊल

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहरासह जिल्ह्यात वाढत्या भटक्या मांजरांच्या समस्येवर उपाय म्हणून नाशिक महानगरपालिकेने मांजरांसाठी गौळाणे शिवारात स्वतंत्र निर्बीजीकरण (नसबंदी) केंद्राला अखेर मंजुरी दिली आहे. भूतदया फाउंडेशनच्या दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा निर्णय प्रत्यक्षात आला आहे. त्याचे प्राणीप्रेमींकडून स्वागत करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांत शहरात भटक्या मांजरांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यातून पिल्लांची संख्याही वाढत असून, अनेकदा ही पिल्ले रस्त्यावर, मोकळ्या जागांमध्ये किंवा इतर ठिकाणी सोडून दिली जातात. परिणामी उपासमार, आजार आणि वाहनांच्या धडकेत मृत्यू अशा गंभीर समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून मांजरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र निर्बीजीकरण केंद्राची गरज व्यक्त केली जात होती.
भूतदया फाउंडेशनने 2024 मध्ये प्रथमच महानगरपालिकेकडे याबाबत अधिकृत निवेदन सादर केले होते. त्यानंतर फाउंडेशनचे अध्यक्ष ऋषिकेश भालेराव यांनी प्रशासनातील विविध अधिकार्‍यांशी सातत्याने पाठपुरावा करत या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली. शहरातील प्राणीप्रेमी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनीही या उपक्रमाला पाठिंबा दिला.
महापालिकेकडून यापूर्वी भटक्या श्वानांसाठी निर्बीजीकरण प्रकल्प राबविला जात आहे. त्याच धर्तीवर आता मांजरांसाठीही ही सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविणे, पिल्लांचे हाल कमी करणे आणि नागरिकांना दिलासा मिळणे शक्य होणार आहे.
भटक्या प्राण्यांच्या समस्येकडे मानवी दृष्टिकोनातून पाहत शाश्वत उपाययोजना करण्याच्या दिशेने महानगरपालिकेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना प्राणीप्रेमींनी व्यक्त केली आहे.

निराधार मुक्या प्राण्यांचे अपघात, उपासमार आणि होणारे हाल थांबविण्यासाठी त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. भटक्या श्वानांसोबतच मांजरांचीही नसबंदी केल्यास त्यांचे जीवन अधिक सुरक्षित होईल. महानगरपालिकेचा हा निर्णय प्राणी कल्याणासाठी महत्त्वाचा आणि स्वागतार्ह आहे.
– ऋषिकेश भालेराव, अध्यक्ष, भूतदया फाउंडेशन

Municipal Corporation approves sterilization center for cats.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

17 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

17 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

17 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

17 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

17 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

17 hours ago