नाशिक

हायड्रॉलिक पुलांचा रस्ता म्हणून वापर टाळा

रेल्वेचे आवाहन; अनधिकृत प्रवेश करणार्‍यांवर कारवाईचा इशारा

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
रेल्वेमार्गाखाली पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी बांधण्यात आलेल्या हायड्रॉलिक (जलनिस्सारण) व वॉटर-वे पुलांचा वापर रस्ता किंवा रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
अनेक ठिकाणी पादचारी, दुचाकीस्वार, ट्रॅक्टर तसेच बैलगाड्या या अरुंद पुलांचा वापर रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, हे पूल केवळ पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी किंवा रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी अधिकृत मार्ग नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
पावसाळ्यात या पुलांमधील पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे वाहून जाणे, बुडणे किंवा गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण होतो. नागरिकांनी रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी केवळ अधिकृत रस्ता उड्डाणपूल, भुयारी मार्ग, रेल्वे फाटक आणि पादचारी पुलांचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वेने स्पष्ट केले की, हे पूल कोणत्याही प्रकारचे अधिकृत रस्ते नसून केवळ जलनिस्सारणासाठी बांधण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवा किंवा दिशाभूल करणार्‍या माहितीकडे दुर्लक्ष करून रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.
रेल्वे हद्दीत अनधिकृत प्रवेश करणे हा दंडनीय गुन्हा आहे. रेल्वे अधिनियम 1989 मधील कलम 147 नुसार नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना सहा महिन्यांपर्यंत कारावास, एक हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. रेल्वे सुरक्षा पथकांनी संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवली असून, नियमभंग करणार्‍यांवर तत्काळ कारवाई केली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी संबंधित ठिकाणी इशारा फलक बसविण्यात येत आहेत. जळगाव, नाशिक, बुलढाणा, अकोला, धुळे आणि खंडवा जिल्ह्यांतील प्रशासन, पोलीस विभाग आणि ग्रामपंचायतींनी अनधिकृत मार्ग बंद करणे, जनजागृती करणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

भुसावळ विभागात 156 संवेदनशील पूल

भुसावळ विभागात 156 हायड्रॉलिक पूल असून, काही ठिकाणी त्यांचा अनधिकृत वापर होत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यात 71, नाशिक जिल्ह्यात 53, बुलढाणा 17, खंडवा 11 तसेच अकोला आणि अमरावती येथे प्रत्येकी दोन संवेदनशील ठिकाणांचा समावेश आहे.

 

 

Avoid using the route with hydraulic bridges.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

18 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

18 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

18 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

18 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

18 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

18 hours ago