नाशिक

मनपा अग्निशमन, अभियांत्रिकीची 24 व 25 फेब्रुवारीला परीक्षा

राज्यात तेरा शहरांत सेंटर, नाशकात 29 सेंटर; तीनशे जागांसाठी 19 हजार 500 अर्ज

नाशिक : प्रतिनिधी
पंचवीस वर्षांपासून महापालिकेत भरती न झाल्याने याचा प्रचंड ताण दैनंदिन कामावर येत आहे. राज्य शासनाने अग्निशमन, वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या पदांसाठीची आस्थापना अट हटवली होती. त्यानंतर प्रशासनाने अग्निशमन 186 व अभियांत्रिकीच्या 114 अशा एकूण तीनशे जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जागांसाठी राज्यभरातील तब्बल 19 हजार 500 उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले असून, येत्या 24 व 25 फेब्रुवारी रोजी नाशिकसह राज्यातील तेरा शहरांतील केंद्रांत ही परीक्षा पार पडणार आहे. याकरिता प्रशासनाकडून तयारी सुरू केली आहे.
शासनाने भरतीप्रक्रियेला हिरवा कंदील दाखवल्यानंतर महापालिकेने टीसीएस कंपनीसमवेत करार केला असून, या कंपनीमार्फतच परीक्षा घेतली जाणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महापालिका प्रशासन गेल्या दीड -दोन वर्षापासून नोकरभरतीसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. नोकरभरतीचा आकृतिबंध तयार करूनही पाठवण्यात आला होता. परंतु, पालिकेचा आस्थापना खर्च थेट 45 टक्क्यांच्या पुढे गेल्याने भरतीप्रक्रिया तांत्रिक अडचणीत साडपली. मात्र, अग्निशमन, वैद्यकीय व अभियांत्रिकी हे विभाग अत्यावश्यक सेवेत असल्याने विभागांना आस्थापनातून वगळून तीनशे पदांसाठी हिरवा कंदील दाखवला.
दरम्यान, वैद्यकीय विभागात गेल्या वर्षी कंत्राटी पद्धतीने तज्ज्ञ डॉक्टरांसह इतर पदे भरल्याने सद्यस्थित फक्त अग्निशमन व अभियांत्रिकी संवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. दरम्यान, अग्निशमन दलात अपुरे मनुष्यबळ असल्याने गाड्या आणि यंत्रसामग्री उपलब्ध असूनसुद्धा प्रशिक्षित कर्मचारी नसल्याचे चित्र आहे. शहरात आगीच्या घटना, अपघात, नैसर्गिक आपत्तीची शक्यता असल्याने नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. अशावेळी अग्निशमन मनुष्यबळ सज्ज असण्याची आवश्यकता आहे. त्यात सिंहस्थ कुंभमेळ्यात अग्निशमन व अभियांत्रिकी विभागाची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

Municipal Corporation Fire and Engineering Exams on February 24th and 25th

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नाशिकमध्ये बेकायदा बाइक टॅक्सींचा सुळसुळाट

अ‍ॅग्रिगेटर धोरणाची मंजुरी नसल्याचा परिवहन विभागाचा दावा पंचवटी : प्रतिनिधी नाशिक शहरात रॅपिडो, ओला आणि…

2 minutes ago

पवननगर पोलीस चौकी ओसाड

सिडको : प्रतिनिधी नाशिकच्या सिडको परिसरातील पवननगर येथील पोलीस चौकी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून…

12 minutes ago

प्रेमविवाहाच्या रागातून येवल्यात लग्नमंडपात राडा

नवरदेवाला पेटवून देण्याचा प्रयत्न येवला : प्रतिनिधी प्रेमविवाहाच्या रागातून येवल्यात भर लग्नमंडपात जोरदार राडा झाला.…

1 hour ago

आरोग्य ते शेतीपर्यंतच्या कामगिरीचे मोदींकडून कौतुक

मोदींच्या 139 व्या ’मन की बात’मध्ये ईशान्येतील भरडधान्य क्रांतीचा विशेष उल्लेख नवी दिल्ली : प्रतिनिधी…

1 hour ago

अर्थखात्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन…

1 hour ago

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौर्‍यावर

नाशिक : प्रतिनिधी समांतर गंगापूर रोड अर्थात स्व. मातोश्री अनुसया रामदास शिंदे मार्ग या महत्त्वाकांक्षी…

1 hour ago