सिडको : प्रतिनिधी
गेल्या दोन महिन्यांपूर्वी सिटी सेंटर मॉलसमोरील रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात वाहन गेल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या केतन विजय बोरसे (वय 25, रा. सावतानगर) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना नाशिक महानगरपालिकेतर्फे पाच लाखांंची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीच्या सभेत या संदर्भातील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
18 जुलै 2026 रोजी रात्री सिटी सेंटर मॉलसमोरील रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात केतन बोरसे यांचे वाहन गेल्याने अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सुरुवातीला नाशिक येथे, तर त्यानंतर मुंबई येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच 8 सप्टेंबर रोजी रात्री त्यांचे निधन झाले.या अपघाताचे दृश्य असलेला व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्याने रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला होता. केतन बोरसे यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांना आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रभाग 25 चे नगरसेवक सुधाकर बडगुजर, साधना मटाले, कविता नाईक आणि मुरलीधर भामरे यांनी 9 सप्टेंबर रोजी दिलेल्या पत्राच्या आधारे आर्थिक मदतीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला. या प्रस्तावानुसार केतन बोरसे यांच्या कुटुंबीयांना मनपातर्फे पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यास नियमानुसार मंजुरी देण्यात आली.
Municipal Corporation provides ₹5 lakh aid to the family of Borse, who died due to a pothole.
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…