महापालिकेने अस्वच्छतेचे ब्लॅक स्पॉट हटवले

स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील अस्वच्छता निर्मूलनासाठी मनपा प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे. शहरातील विविध स्वयंसेवी संघटना व नागरिकांकडून संबंधित परिसरातील अस्वच्छता व कचर्‍याच्या ढिगाकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार महापालिकेकडून याप्रकरणी तत्काळ कार्यवाही करत गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राजवळील डीजीपीनगर प्रभाग 23 मधील हाय रिस्क ब्लॅक स्पॉट हटविण्यात आले.
नाशिक महापालिका, स्वच्छ भारत अभियान व उन्नत नाशिक अभियानांंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरात झिरो ब्लॅक स्पॉट ड्राइव्ह प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन तसेच मनपा पदाधिकारी, नगरसेवक यांनी नागरिकांना आवाहन केले की, नाशिक ही धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेली देवभूमी असून, शहराचे पावित्र्य, स्वच्छता व सौंदर्य जपणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता घंटागाडीतच द्यावा, तसेच स्वच्छतेबाबत महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन केले. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आकर्षक वॉल पेंटिंग करण्यात आले असून, ओला व सुका कचरा वर्गीकरण करून घंटागाडीतच टाकावा, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका. स्वच्छ परिसर हीच खरी जबाबदारी या संदेशाद्वारे नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. महापालिकेकडून शहरातील प्रमुख रस्ते, चौक, मोकळी मैदाने, नदीकाठ परिसर व वारंवार कचरा टाकला जाणारे हाय रिस्क स्पॉट ओळखून ते कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्यात येत आहे. संबंधित ठिकाणी नियमित स्वच्छता, फवारणी, जनजागृती उपक्रम, तसेच आवश्यकतेनुसार दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येणार आहे. शहर स्वच्छता व जनजागृतीसाठी राबविण्यात येणार्‍या झिरो ब्लॅक स्पॉट ड्राइव्ह उपक्रमाचे स्वागत सामाजिक संघटनांनी केले आहे. महापालिकेने सातत्याने कारवाई करून शहरातील इतर अस्वच्छ ठिकाणे स्वच्छ करावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Municipal Corporation removes black spots of unsanitary conditions

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

9 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

9 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago