नाशिक

महापालिकेचे तीन हजार कोटींचे अंदाजपत्रक

नाशिककरांची यंदाही करवाढीतून सुटका; शहरासाठी कोणताही नवीन प्रकल्प नाही

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेने सन 2026-27 या आर्थिक वर्षाचे तीन हजार 11.85 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सोमवारी (दि. 2 मार्च) सादर केले. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांना हे अंदाजपत्रक सादर केले. दरम्यान, यंदा नाशिककरांवर कुठलीही करवाढ, दरवाढ केलेली नाही; परंतु शहरासाठी कुठल्याही नव्या योजनेची घोषणा केलेली नाही. यंदाही उत्पन्नाचे कुठलेही नवीन स्रोेत नसल्याने मालमत्ता कर व विकास शुल्कातून मिळणार्‍या उत्पन्नावरच अवलंबून राहावे लागणार आहे. दरम्यान, या अंदाजपत्रकाद्वारे जुन्याच योजनांना मुलामा दिल्याचे चित्र आहे.
स्थायी सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली झालेले हे अंदाजपत्रक आयुक्त मनीषा खत्री यांनी मांडले. नगरसचिव मदन हरिश्चंद्र यांनी सभेचे कामकाज सुरू केले. नाशिक महापालिकेचे 34 वे अंदाजपत्रक सादर केले गेले. या अंदाजपत्रकाद्वारे नाशिककरांवर करवाढीचा बोझा टळला आहे. अंदाजपत्रकातून शहराला नवीन काय मिळणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष होते. मात्र, प्रशासनाकडून कुठलीही नवीन योजना किंवा प्रकल्पाची घोषणा केली नाही. महापालिकेचे उत्पन्न कसे वाढणार यावर अंदाजपत्रकात काहीही भाष्य नाही. त्यासाठी कोणतेही नियोजन केलेले दिसले नाही. मालमत्ता कर, जीएसटी आणि बांधकाम विकास शुल्क हे पारंपरिक आर्थिक स्रोेत सक्षम करून त्यातून उत्पन्न वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. पायाभूत सुविधा, मलवाहिका, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि वाहतूक या घटकांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करतानाच त्यासाठी निधी राखून ठेवण्यात आला आहे.

मनपा आयुक्तांनी चालू आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले आहे. त्यावर येत्या दोन-चार दिवसांत स्थायी समितीची बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली जाईल. स्थायी सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. या अंदाजपत्रकाद्वारे शहराच्या विकासाला चालना कशी मिळेल, हा आमचा प्रयत्न आहे.
– मच्छिंद्र सानप, सभापती, स्थायी समिती

अंदाजपत्रकाची वैशिष्टये

♦ 437 कोटींची नवीन विकासकामे.
♦ 2026-27 आर्थिक वर्षात मालमत्ता कर व पाणीपट्टीचे 393.17 कोटींचे टार्गेट.
♦ शिक्षण विभागाकरिता 24 कोटी. गतवर्षी 4 कोटींचीच तरतूद.
♦ बांधकाम विभागासाठी यंदा 471 कोटी.
♦ रस्ते सुरक्षा जनजागृतीसाथी 17 कोटी.
♦ सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी 194 कोटी.
♦ विद्युत व यांत्रिकी व्यवस्थापन 137.71 कोटी,
♦ सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन 40.44 कोटी.
♦ घनकचरा व्यवस्थापन 194.90 कोटी.
♦ समाजकल्याण विभाग 126 कोटी.
♦ नगरनियोजन व्यवस्थापन 116 कोटी.

Municipal Corporation’s budget of three thousand crores

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

लाल कांद्याच्या दरात 400 रुपयांची घसरण

लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…

2 days ago

सगुण-निर्गुण एकचि पांडुरंग!

कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…

2 days ago

थेट विरोध

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच आहे. शरद पवारांच्या आजारपणात विलीनीकरणाची चर्चा…

2 days ago

ड्रेनेज, पाणीपुरवठ्याच्या 370 कोटींच्या खर्चाला मंजुरी

सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…

2 days ago

इलेक्ट्रिक बससाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नाही

अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…

2 days ago

स्वीकृतच्या दहा नगरसेवकांची अखेर नियुक्ती

महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…

2 days ago