नाशिक

मनपा रुग्णालये दुसर्‍या वर्षीही राज्यात प्रथम

एकवीस रुग्णालयांना 15 लाखांची बक्षिसे

नाशिक : प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सलग दुसर्‍या वर्षी गुणवत्ता आश्वासन कायाकल्प कार्यक्रम स्पर्धेत राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. शासनाकडून महानगरपालिकेच्या एकुण 21 रुग्णालयांना वर्ष 2024-25 अंतर्गत 15 लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. शहरी सामुदायिक आरोग्य केंद्र या गटात हे बक्षीस मिळाले आहे.
राष्ट्रीय शहरी आरोग्य गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत महानगरपालिकेचे सर्व शहरी प्राथमिक व शहरी सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये कायाकल्प हा कार्यक्रम हा राज्य शासनाचे दिलेल्या मार्गदर्शनानुसार व मूल्यमापन बँक लिस्ट नुसार राबविण्यात येतो. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत रुग्णालयातील सुविधा आणि देखभाल व स्वच्छता, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन व संसर्ग नियंत्रण सेवा आदी घटकांचे दरवर्षी मूल्यमापन करुन उत्कृष्ट केंद्रांना कायाकल्प कार्यक्रमांतर्गत दरवषी बक्षीस दिले जाते. मायको सातपूर रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, पंचवटी श्री स्वामी समर्थ रुग्णालय मोरवाडी, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय, नाशिक रोड तसेच डॉ. झाकिर हुसैन रुग्णालय यांस प्रोत्साहनात्मक बक्षीस प्रत्येकी एक लाख, असे एकूण पाच लाख रुपयांचे पुरस्कार मिळाले आहे.त शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र गटात सिडको शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र बास प्रथम पारितोषिक (दोन लाख) जाहीर करण्यात आले आहे. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दसक पंचक यांना प्रथम उपविजेते (1.5 लाख) व इतर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जिजामाता, उपनगर, संजीवनगर, वडाळागाव, एमएचबी कॉलनी, पंचवटी, हिरावाडी, सिन्नरफाटा, गोरेवाडी, पिंपळगाव खांब, अंबड, सिव्हील हॉस्पिटल, मखमलाबाद, इंदिरा गांधी तपोवन यांना प्रति रुग्णालयांना रुपये 50 हजार रुपये प्रोत्साहन बक्षीस जाहीर केले आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजित साळुंके,
डॉ. जितेंद्र धनेश्वर व शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. हीना शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांच्या मार्गदर्शनाने व इतर अधिकारी यांच्यामुळे यंदाही आरोग्य विभागाने चांगली कामगिरी करत दुसर्‍या वर्षी प्रथम क्रमांक मिळवला आहे.
-डॉ. तानाजी चव्हाण,
वैद्यकीय अधिकारी मनपा

 

Editorial Team

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

19 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

21 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago