दिंडोरी : प्रतिनिधी
पाळीव कुत्रा शेतजमिनीत गेल्याच्या वादातून एकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून झाल्याची घटना तालुक्यातील गोळशी शिवारात घडली. याप्रकरणी दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोळशी शिवारातील टिभू पिंगळे यांचा पाळीव कुत्रा लगतच्या सुदाम मुळाणे यांच्या शेतजमिनीत गेल्याने पिंगळे व मुळाणे यांच्यात वाद उदभवला होता. त्यानंतर सत्यभामा पिंगळे या शेतीतून भेंडी काढत असताना सुदाम मुळाणे व रवींद्र मुळाणे या ठिकाणी आले व शिविगाळ करु लागले. यावेळी टीभु पिंगळे हे समजावून सांगत असताना रवींद्र मुळाणे याने टिभू पिंगळे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्यांच्या डोक्यात व पोटात वर्मी वार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. पिंगळे यांना नाशिक येथे उपचारार्थ दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. सत्यभामा पिंगळे यांनी दिंडोरी पोलिसांत फिर्याद दिली असून, रवींद्र मुळाणे व सुदाम मुळाणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मोनिका जेजोड, हवालदार बाळासाहेब पजई करीत आहेत.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…