नाशिकरोड येथील जाधववाडीत मध्यरात्री हत्या; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
सिडको : दिलीपराज सोनार
नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाधववाडी, गोरेवाडी येथील संतोष जाधव यांच्या घराच्या मागे झालेल्या एका भीषण हल्ल्यात कृष्णा नावाच्या युवकाची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान गेल्या आठ दिवसात चौथा खून झाला असुन या वाढत्या खुनाच्या घटनेमुळे नाशिककर भयभीत झाले आहे .
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मोईन शेख (रा. उपनगर, नाशिक) याने जुन्या भांडणाची कुरापत काढून त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने कृष्णा याच्या पाठीवर वार केला. त्याच्या सोबत असलेल्या चिराग उर्फ मोगली बारसे याने कोयत्याने कृष्णावर वार केला. तसेच प्रकाश उर्फ आशु बारसे याने देखील हल्ला केला, तर यश बारसे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चौघांनी मिळून कृष्णा याला गंभीर जखमी केले, ज्यात त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी कृष्णाची बहीण ज्योती मनोज अहिरे (वय ३२, रा. हिवाळेवाडी, गोरेवाडी) हिने नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…