नाशिक

जीएसटी दरात घट; वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल

सिन्नर : प्रतिनिधी
केंद्र शासनाने जीएसटीच्या दरात मोठी घट केल्यामुळे यंदा वाहन खरेदीला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसर्‍याचा मुहूर्त साधत सिन्नरकरांनी वाहन व घर खरेदीला प्राधान्य दिले. शहरातील वेगवेगळ्या कंपन्यांच्या शोरूममधून यंदा शेतकर्‍यांनी सुमारे 225 ट्रॅक्टर खरेदी केले. याशिवाय, 300 दुचाकी आणि 50 हून अधिक कार दसर्‍याच्या मुहूर्तावर दारात आल्या. वाहन खरेदी तब्बल 20 ते 25 कोटींची उलाढाल झाली. दुसरीकडे सोन्याच्या भावाचा उच्चांक झाल्याने सोने खरेदीकडे मात्र ग्राहकांनी काहीशी पाठ फिरवली.

केंद्र सरकारने जीएसटी संरचनेत केलेल्या बदलामुळे चारचाकी वाहनांच्या किमतीमध्ये तब्बल एक लाखापेक्षा अधिक रकमेची घट झाली. त्यामुळे ईएमआय घटल्याने वाहन खरेदीला प्राधान्य दिले गेले.
दुचाकीच्या किमतीही सरासरी आठ ते दहा हजारांनी कमी झाल्या. त्यामुळे 300 हून अधिक दुचाकीही विकल्या गेल्या. पेट्रोल, डिझेलसोबतच इलेक्ट्रिक आणि सीएनजी व्हेईकललाही मागणी असल्याचे दिसून आले.
शहरात प्लॉट, फ्लॅट, दुकाने, रोहाउस व रो-बंगलो विकत घेण्यास आणि रिकाम्या प्लॉटवर घराचे बांधकाम करण्याचा अनेकांनी मुहूर्त साधला.

शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरला पसंती

बैलांची शेती जवळपास हद्दपार झाल्यामुळे शेतकर्‍यांकडून ट्रॅक्टरला पसंती दिली जात आहे. दोन वर्षांपासून संपूर्ण तालुक्यात शेती सिंचनाच्या सुविधा वाढल्या असून, शेतकर्‍यांचे अर्थकारण रुळावर आले आहे. शेतीसोबतच दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालनाने अर्थकारणाला बळकटी मिळाली आहे. त्यामुळे शेती मशागतीसाठी बहुसंख्य शेतकर्‍यांचा दसर्‍याच्या मुहूर्तावर ट्रॅक्टर खरेदीकडे कल दिसून आला.

Editorial Team

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago