म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षाचालकाचा खून

सिडको : दिलीपराज सोनार

म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. गेल्या पंधरा दिवसांत ही शहरातील दुसरी घटना असून काही दिवसांपूर्वी पंचवटीतील कर्णनगर परिसरात एका युवकाची त्याच्याच मित्रांनी मागील भांडणाची कुरापत काढून खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा म्हसरूळ परिसरात एका युवकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान गेल्या पंधरा दिवसात शहरातील खुनाची दुसरी घटना असुन यावरुन शहारातील कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली की काय असा सवाल उपस्थित होत आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत अशोक तोडकर (वय २८) रा. आदर्शनगर, रामवाडी असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. सदर युवक हा रिक्षाचालक चालक असून तो सीबीएस ते म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत होता. सदर युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याचे बोलले जात असून शनिवारी दिवसभर हा युवक घरी होता. पंरतु, रात्री तो घराबाहेर पडला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर आज सकाळी आठ वाजता मयत युवकाच्या भावाला पोलिसांकडून (Police) त्याचा खून झाल्याची घटना समजली. सदर युवकाच्या पश्चात दोन भाऊ, एक बहिण आणि आई वडील असा परिवार आहे.आयुक्तालय हद्दीतील वाढती गुन्हेगारी, खुन हाणामारी, चोरी, घरफोड्याच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे नाशिककरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकमध्ये पुन्हा खून; या भागात घडली घटना

सिडको : दिलीपराज सोनार सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजवाडा येथे पती पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातुन…

16 minutes ago

पाऊस, वादळामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान

144 हेक्टरवरील पिकांना फटका; नुकसानीचे पंचनामे होणार निफाड ः प्रतिनिधी तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी…

18 hours ago

येवला तालुक्यात 29 टँकरद्वारे पाणीपुरवठा

विहिरींनी गाठला तळ; जनावरे, हरणांची पाण्यासाठी वणवण येवला ः प्रतिनिधी येवला तालुक्यात यंदाच्या वर्षी उन्हाने…

18 hours ago

नांदगावला पाणीटंचाईसंदर्भात आढावा बैठक

नांदगाव ः प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील उपलब्ध जलसाठे, त्यातील क्षमता व शेतीसिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकार्‍यांसोबत आमदार…

19 hours ago

नवीन घरातून 83 हजार रुपयांचा ऐवज लंपास

आडगाव परिसरातील कोणार्कनगर-2 येथील महादेव रो-हाउसमध्ये अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.फिर्यादी…

19 hours ago

वारसहक्काच्या वादातून सख्ख्या भावाचे अपहरण?

सिडको : विशेष प्रतिनिधी घरगुती प्रॉपर्टीच्या वादातून सख्ख्या भावाचे अज्ञात ठिकाणी अपहरण केल्याचा आरोप एका…

19 hours ago