सुकदेव मुरकुटे यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर

नाशिक : वार्ताहर
लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस उपनिरीक्षक सुकदेव मुरकुटे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.
1990 ला पोलीस सेवेत दाखल झालेल्या मुरकुटे यांनी मनमाड शहरातून सेवेला प्रारंभ केला. स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, दहशतवाद विरोधी पथक, आर्थिक गुन्हे शाखा आदी ठिकाणी त्यांनी काम केले. मनमाड येथे असताना ओझर पोलिस स्टेशन दरोड्यातील आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीतील संशयित आरोपीला केवळ वायरलेस संदेशावरील वर्णनाच्या आधारे त्यांनी पकडले होते. येवला शहर पोलिस स्टेशन येथे कार्यरत असताना राज्य महामार्गावर दरोडे घालणार्‍या आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीने बंदुकीतून गोळीबार केल्यानंतरही त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून बंदुकीसह पकडले होते. दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असताना औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरण व जंगली महाराज रोड पुणे येथील साखळी बॉम्बस्फोटातील अतिरेकी अनुक्रमे सैयद मुस्तफा व बंटी जहागीरदार यांना हैदराबाद व नगर येथून अटक करून यशस्वी कामगिरी केली होती.

Ashvini Pande

Recent Posts

कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले पण खाते बदलले, आता हे खाते

मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…

7 hours ago

मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात

मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात मनमाड : आमिन शेख गेल्या सतरा वर्षांपासून न्यायच्या…

16 hours ago

मालेगाव बॉम्बस्फोट खटला: सर्व आरोपी निर्दोष

नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…

19 hours ago

जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल जालन्याच्या जिल्हाधिकारी,

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…

1 day ago

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती!

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर  : साजिद…

2 days ago

विवाह हा संस्कार

भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…

2 days ago