नाशिक

अतिरिक्त आयुक्तांच्या खुर्चीसाठी संगीत खेळ

चौधरी पद सोडत नसल्याने भदाणे यांची अडचण

नाशिक : प्रतिनिधी
मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांची नाशिक महापालिकेत दोन वर्षांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली होती. या आदेशानुसार प्रतिनियुक्तीचा कालावधी संपुष्टात आला असून, त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून त्यांच्या सेवा ग्रामविकास विभागाकडे वर्ग करण्यात येत असल्याचा आदेश 21 एप्रिल रोजी नगरविकास विभागाने जारी केला होता. दरम्यान ही खुर्ची चौधरी सोडण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. परिणामी यावरून मोठा पेच निर्माण झाला आहे.यामागे कोणाचा दबाव आहे, असा सवाल केला जात आहे.
या आदेशात जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे यांची चौधरी यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त या पदावर दोन वर्षे कालावधीकरिता प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेशित करण्यात आले होते. मात्र, चौधरी खुर्ची सोडण्यास तयार नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या अवर सचिव लतिका पाटील यांनी 1 जून रोजी आदेश जारी करत नीलेश भदाणे यांना अतिरिक्त आयुक्त या पदावर नगरविकास विभाग व सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार दोन वर्षांच्या कालावधीकरिता प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर हजर होण्याकरिता भदाणे यांना अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय मुंबई येथून कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.हे आदेश मनपाला 23 जून रोजी प्राप्त झाले आहेत. त्यानुसार भदाणे गेल्या आठवड्यात नाशिक मनपात हजर होण्यासाठी आले. मात्र, आयुक्त मनीषा खत्री यांनी त्यांना हजर करून न घेतल्याने भदाणे हे आल्या पावली माघारी फिरले. शासन आदेशाची अंमलबजावणी मनपा प्रशासनाकडून का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोन अधिकार्‍यांमधील खुर्चीचा हा वाद वा खेळ महापालिकेत सुरू आहे.
याबाबत आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

नेमके कुणाचे वजन की दबाव?
अधिकार्‍यांच्या बदल्यांचा विषय हा नेहमीच बहुचर्चेचा विषय ठरतो. आताही नाशिक महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त-1 या पदाच्या खुर्चीचा म्हणजेच बदलीचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे. या पदावर सध्या प्रदीप चौधरी विराजमान आहेत. त्यांच्या जागेवर राज्य शासनाने नीलेश भदाणे या अधिकार्‍यांची प्रतिनियुक्तीने दोन वर्षांसाठी बदली केली आहे. मात्र, चौधरी खुर्ची सोडायला तयार नसल्यामुळे भदाणे खुर्चीसाठी महापालिकेत फेर्‍या मारत आहेत. गेल्या तीन ते चार वेळा भदाणे मनपात हजर होण्यासाठी आले. मात्र, त्यांना हजर करून घेण्यात आले नाही. यामुळे या प्रकरणामागे नेमके कुणाचे वजन वा दबाव आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Musical chairs for the Additional Commissioner’s post

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago