नाशिक

जिल्ह्यात 73.39 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण

7.92 लाख मतदारांमध्ये विसंगती

नाशिक : प्रतिनिधी
मतदारयादी शुद्धीकरण आणि निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या घरनिहाय मतदार मॅपिंग मोहिमेत नाशिक जिल्ह्याने लक्षणीय प्रगती केली आहे. जिल्ह्यातील 51 लाख 8 हजार 912 पैकी 37 लाख 49 हजार 533 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. हे प्रमाण 73.39 टक्के आहे. मात्र, अद्याप 13 लाख 59 हजार 379 मतदारांचे मॅपिंग बाकी आहे. सात लाख 92 हजार 135 मतदारांमध्ये विविध विसंगती आढळून आल्या आहेत.
जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांत ही मोहीम राबविण्यात येत आहे. सर्वाधिक मॅपिंग इगतपुरी मतदारसंघात 89.37 टक्के झाले. त्यापाठोपाठ बागलाण 87.30 टक्के, येवला 86.30 टक्के आणि चांदवड 85.44 टक्के या मतदारसंघांचा क्रमांक लागतो.
दुसरीकडे, नाशिक शहरातील मतदारसंघांत मॅपिंगची गती तुलनेने कमी असल्याचे दिसते. नाशिक मध्य मतदारसंघात केवळ 46.28 टक्के, तर नाशिक पश्चिममध्ये 52.19 टक्के व देवळाली मतदारसंघात 53.71 टक्के मॅपिंग झाले आहे. मतदारयादी अधिक अचूक व त्रुटीमुक्त करण्यासाठी निवडणूक विभागाकडून विशेष पडताळणी मोहीम सुरू आहे. उर्वरित मतदारांचे मॅपिंग लवकरच होईल.

मतदारांच्या इतर माहितीची पडताळणी
जिल्हाभरात सात लाख 92 हजार 135 मतदारांच्या नोंदींमध्ये विसंगती आढळली आहे. या प्रकरणांत पत्ता, घर क्रमांक, कुटुंबीय तपशील किंवा इतर माहितीची पडताळणी करण्यात येणार आहे.

इगतपुरी अव्वल, नाशिक मध्य सर्वांत मागे
मतदार मॅपिंगमध्ये इगतपुरी विधानसभा मतदारसंघ 89.37 टक्क्यांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. नाशिक मध्य मतदारसंघात केवळ 46.28 टक्के मॅपिंग पूर्ण झाल्याने हा मतदारसंघ तळाशी आहे.

 

Mapping of 73.39 percent of voters completed in the district.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago