अग्रलेख

मस्क यांचे दुखणे

अमेरिकेतील उद्योगपती एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ’एक्स’वर मुकेश अंबानी यांना उपरोधिकपणे ’प्राइम मिनिस्टर अंबानी’ (पंतप्रधान अंबानी) आणि ’भारताचे खरे बॉस’ असे म्हटले. स्वतःची मक्तेदारी टिकवण्यासाठी ’स्टारलिंक’ला भारतात येण्यापासून अंबानी रोखत आहेत, असा टोमणाही त्यांनी मारला. स्टारलिंक या सॅटेलाइट (उपग्रह) इंटरनेट कंपनीला भारतात व्यावसायिक सेवा सुरू करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अंतिम मंजुरी मिळालेली नाही, हेच मस्क यांचे दुखणे आहे. मुकेश अंबानींची रिलायन्स जिओ आणि सुनील भारती मित्तल यांची एअरटेल या दोन कंपन्याही याच क्षेत्रात उतरणार आहेत. अंबानी आपल्या प्रभावाचा वापर करून स्टारलिंकचा रस्ता अडवत असल्याचा मस्क यांचा आरोप आहे. भारत सरकारने मस्क यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. भारतात स्टारलिंकसह जिओ आणि एअरटेल या तीन कंपन्यांना प्राथमिक परवाने मिळाले असून, त्या एकाच नियामक टप्प्यावर आहेत, असे संचार मंत्रालयाने स्पष्टपणे म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा पडताळणी आणि डेटा सुरक्षेच्या कडक नियमांमुळे या प्रक्रियेला वेळ लागत आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. सॅटेलाइट इंटरनेटचा डेटा भारतातच सुरक्षित राहावा आणि देशाच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी तपासणी सुरू आहे. असे असतानाही भारत सरकारकडून मंजुरी मिळण्यास उशीर होत असल्याने मस्क यांनी अंबानींना टोमणा मारला. मस्क यांची स्टारलिंक, अंबानी यांच्या रिलायन्स जिओची जिओ सॅटकॉम आणि भारती समूहाची (मित्तल) यूटेलसॅटवनवेब यांना परवाने दिले आहेतच परंतु आवश्यक सुरक्षा तपासणी आणि स्पेक्ट्रम-संबंधित मंजुरी पूर्ण होईपर्यंत यापैकी कोणतीही कंपनी व्यावसायिक सेवा सुरू करू शकत नाही. हा विषय गृहमंत्रालयाकडे प्रलंबित आहे. दूरसंचार विभागाने सर्व सॅटकॉम कंपन्यांना परवाने, तसेच तात्पुरते स्पेक्ट्रम जारी केले आहेत. आता सुरक्षा मंजुरीसाठी हा विषय गृहमंत्रालयाकडे प्रलंबित आहे. एकदा ती मंजुरी मिळाली की, कंपन्यांना सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणे शक्य होईल. हे स्पष्ट असतानाही केवळ आपल्या स्टारलिंकला अंबानी यांच्या दबावामुळे रोखण्यात आल्याचे मस्क यांचे म्हणणे आहे. त्याचमुळे त्यांनी अंबानी यांना उपरोधिकपणे पंतप्रधान म्हटले. ’स्टारलिंक’ या सॅटेलाइट इंटरनेट सेवेला भारतात परवानगी मिळण्यास गेल्या पाच वर्षांपासून विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर मस्क यांनी पोस्टमध्ये लिहिले, ’प्रिय पंतप्रधान अंबानी, तुम्हीच भारताचे खरे बॉस आहात हे न समजल्याबद्दल कृपया माझी नम्र माफी स्वीकारा…’ अंबानी यांनी भाजपा व सरकारवर दबाव टाकून स्टारलिंकचा भारतप्रवेश रोखल्याचा मस्क यांचा थेट आरोप आहे. 9 ऑक्टोबरच्या पहिल्या पोस्टनंतर दुसर्‍या दिवशी 10 ऑक्टोबर रोजी आणखी एक पोस्ट टाकून अंबानींचे भाजपा व सरकारशी संबंध असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मीडियातील वृत्तांच्या आधारे तसे सिद्ध करण्याचाही प्रयत्न केला. रिलायन्सशी संबंधित कंपन्यांनी भाजपाच्या निवडणूक मोहिमांना पाठबळ दिले आहे आणि इलेक्टोरल बाँड्सच्या (निवडणूक रोखे) माध्यमातून मोठ्या प्रमाणात राजकीय देणग्या दिल्या, असे आरोप मस्क यांनी अंबानींवर केले. मुकेश अंबानी भारतात स्वतःची एकाधिकारशाही टिकवून ठेवण्यासाठी सरकारवर प्रभाव टाकत असल्याचा दावाही त्यांनी केला. इलेक्टोरल बाँड्सच्या (निवडणूक रोखे) माध्यमातून रिलायन्सशी संबंधित कंपनीने भाजपाला 385 कोटी रुपयांची राजकीय देणगी दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यांनी मीडियातील वृत्तांचे स्क्रीनशॉट्सही आपल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ शेअर केले. स्वतःची मक्तेदारी
टिकवून ठेवण्यासाठी आणि स्पर्धा रोखण्यासाठी अंबानी हे भाजपा आणि सरकारवर आपला प्रभाव पाडत असल्याचा थेट आरोप मस्क यांचा आहे. स्टारलिंकला जाणूनबुजून रोखले जात असल्याचे आरोप भारत सरकारने
फेटाळले असले, तरी अंबानी हे भाजपाला मदत करून स्टारलिंकला रोखत असल्याच्या त्यांच्या आरोपालाही त्यांनी मीडियातील पुरावे जोडले आहेत. अंबानी यांचा भाजपा व सरकार यांच्यावर प्रभाव राहिला, तर आपल्या स्टारलिंकला भारतात प्रवेश मिळणे कठीण आहे, अशी भीतीच मस्क यांना वाटत असावी, असे दिसते. स्टारलिंक ही कंपनी सॅटेलाइट इंटरनेट सेवा देणारी जागतिक कंपनी आहे. तिची सेवा 152 देशांत सुरू आहे. उपग्रहाद्वारे जगातल्या कोणत्याही दुर्गम भूप्रदेशात इंटरनेट आणि दूरसंचार सेवा ही कंपनी देऊ शकते. अगदी खोल समुद्रातही अतिजलद इंटरनेट कनेक्शन उपलब्ध होऊ शकते, असे सांगितले जाते. जिओ सॅटकॉम आणि यूटेलसॅटवनवेब या कंपन्या अशीच सेवा देऊ शकतील, असे मानले, तरी दोन्ही कंपन्यांनी तसा दावा केलेला नाही. दोन्ही कंपन्यांना आपल्या सेवेची चाचणी घ्यावी लागेल. तिन्ही कंपन्यांना व्यवसाय करण्यास मंजुरी मिळाली, तर भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा उपलब्ध होऊन स्पर्धाही वाढेल. अतिदुर्गम भागात अद्याप इंटरनेट सेवा पोहोचली नाही. भारतात फाइव्हजीची सेवा सर्वांत वेगवान असली, तरी ती सुरळीत नाही. अनेकदा इंटरनेट डिस्कनेक्ट होण्याचे प्रकार घडतात किंवा आउट ऑफ रेंजचा अनुभव येतोच. इंटरनेट स्लो होणे, कॉल कट होणे असे अनुभव येतातच. इंटरनेट कनेक्शनच्या बाबतीत आपला देश सक्षम नाही. हे वास्तव लक्षात घेता सॅटेलाइट इंटरनेट येत असेल, तर विरोध करून चालणार नाही. स्टारलिंक या सॅटेलाइट इंटरनेट सेवेला भारतात परवानगी मिळण्यास गेल्या पाच वर्षांपासून विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर मस्क यांनी पोस्टमध्ये लिहिले, ’प्रिय पंतप्रधान अंबानी, तुम्हीच भारताचे खरे बॉस आहात हे न समजल्याबद्दल कृपया माझी नम्र माफी स्वीकारा…;’ अंबानी यांनी भाजपा व सरकारवर दबाव टाकून स्टारलिंकचा भारत प्रवेश रोखल्याचा मस्क यांचा थेट आरोप आहे. 9 ऑक्टोबरच्या पहिल्या पोस्टनंतर दुसर्‍या दिवशी 10 ऑक्टोबर रोजी आणखी एक पोस्ट टाकून अंबानींचे भाजपा व सरकारशी संबंध असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. भारतात जर मस्क यांची स्टारलिंक कंपनी आली तर अंबानी यांची जिओ कंपनी व्यावसायिकदृष्ट्या अडचणीत येऊ शकेल. त्यामुळे अंबानी यांचा व्यक्तिगत स्वार्थासाठी स्टारलिंकला विरोध आहे, हाच मस्क यांचा कयास आहे.

Musk’s Ailment

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

7 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

7 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

7 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

7 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

7 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

8 hours ago