पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत सार्वजनिक मंडळांना 72 हजार, घरगुती स्पर्धकांना 61 हजारांची पारितोषिके
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2026 मध्ये सार्वजनिक गणेश मंडळांच्या गटात सिद्धेश्वर मंडळाने, तर घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत गोकुळ देसाई यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सार्वजनिक गणेश मंडळांना एकूण 72 हजार रुपये, तर घरगुती गणेशोत्सव स्पर्धकांना 61 हजार रुपयांची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी शहरातील 22 सामाजिक संस्थांचाही सन्मान करण्यात आला.
नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, आरोग्य सभापती ललिता हांडे यांच्या संकल्पनेतून आणि मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सीमंतिनी कोकाटे होत्या. सागर विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत वरंदळ, जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र चव्हाणके, उपनगराध्यक्षपदी हर्षद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात सीमंतिनी कोकाटे यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेच्या उपक्रमाचे कौतुक केले. गणेशोत्सव हा धार्मिक उत्सवाबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक प्रबोधनाचे माध्यम बनावा, असे त्या म्हणाल्या. पुढील वर्षी अधिकाधिक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कविसंमेलन झाले. रवींद्र मालुंजकर, प्रशांत केंदळे, किरण भावसार, रवींद्र कांगणे, प्रा. राजाराम मुंगसे आणि प्रा. जावेद शेख यांनी विविध विषयांवरील कविता सादर केल्या. गायन, शाहिरी, इतिहास, संशोधन व अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल हर्षद गोळेसर, दुहिता गोळेसर, शाहीर स्वप्निल डुंबरे, प्रा. जावेद शेख आणि संजय गंगावणे यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
यावेळी गटनेते मनोज देशमुख, गटनेत्या शोभा जाधव, सभापती कांताबाई जाधव, सभापती उदय गोळेसर, नगरसेवक पंकज जाधव, बाळासाहेब उगले, विलास जाधव, विजय वरंदळ, नगरसेविका योगिता वरंदळ, नगरसेवक शुभम वारुंगसे, सागर कोथमिरे, अमोल कासार, राजेंद्र पगार, दत्तात्रय हांडे, हरिभाऊ वरंदळ आणि ज्ञानेश्वर उबाळे उपस्थित होते.
सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर यांनी केले. स्वच्छता निरीक्षक मनोहर बोरसे, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव आणि शहर समन्वयिका सायली बाविस्कर यांनी नियोजन केले. आरोग्य सभापती ललिता हांडे यांनी आभार मानले.
घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे निकाल
घरगुती गटात गोकुळ देसाई प्रथम (10 हजार रुपये), आशा देसाई द्वितीय (9 हजार), राज जाधव तृतीय (8 हजार), सत्यम मुजुमदार चतुर्थ (7 हजार), हर्षदा देशमुख पाचवी (6 हजार), देवांश बाळदे सहावा (5 हजार), विजय कोळी सातवा (4 हजार), मानसी गरुड आठवी (3 हजार), अतिश लोंढे नववा (2 हजार) आणि अर्णव इघेवाड दहावा (1 हजार) ठरले. यश देशमुख आणि श्रेया हांडे यांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
शाडू मातीच्या मूर्ती, सामाजिक संस्थांचाही सन्मान
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी शाडू मातीच्या गणेशमूर्ती निर्मिती स्पर्धेतील 14 स्पर्धकांना प्रत्येकी 500 रुपये देण्यात आले. शाळांमध्ये शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. सहभागी शाळांना ट्रॉफी, तर प्रत्येक संबंधित शाळेतील 10 विद्यार्थ्यांना मेडल देऊन प्रोत्साहित करण्यात आले. विविध क्षेत्रांत कार्य करणार्या 22 सामाजिक संस्थांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचे परीक्षक डॉ. महावीर खिंवसरा, डॉ. योगेश हंडोरे आणि शाडू माती कार्यशाळेचे प्रशिक्षक परेश जुमनाके यांना प्रत्येकी 1,500 रुपये, ट्रॉफी व वृक्षरोप देऊन सन्मानित करण्यात आले.
सार्वजनिक गणेश मंडळांचे विजेते
पर्यावरणपूरक सजावट, स्वच्छता, रक्तदान, वृक्षारोपण व सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम राबविणार्या सिद्धेश्वर मंडळाने प्रथम क्रमांक व 25 हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. विघ्नहर्ता मंडळाने द्वितीय क्रमांक (15 हजार), सोनचाफा महिला मंडळाने तृतीय क्रमांक (11 हजार), सप्तशृंगी मित्रमंडळाने चतुर्थ क्रमांक (7 हजार), तर निर्मलधाम कला-क्रीडा मंडळाने पाचवा क्रमांक (5 हजार) पटकाविला. धनलक्ष्मी मित्रमंडळ, म्हसोबा मित्रमंडळ आणि राजे शिवछत्रपती गणेश मंडळाला प्रत्येकी तीन हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
Siddheshwar takes first place among public Ganesh Mandals; Gokul Desai tops the list for household Ganesh celebrations.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…