मोदींकडून माझा फोन टॅप : राहुल गांधी

नवी दिल्ली : प्रतिनिधी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझा फोन पंतप्रधान टॅप करत आहेत. माझ्या आरोपांचे सर्व पुरावे याच फोनमध्ये आहेत आणि ते पंतप्रधानांना माहीत आहेत, असे राहुल गांधी इंस्टाग्रामवरील ‘आस्क मी’ सत्रात फोन हातात धरून म्हणाले.
राहुल गांधी यांनी गेल्या 12 दिवसांत सातव्यांदा मोदींना समोरासमोर वादविवादाचे आव्हान दिले आहे. मला लांब भाषणांची चर्चा नको. एका टेबलावर एका बाजूला मोदीजी आणि दुसर्‍या बाजूला मी- असा वन-ऑन-वन वादविवाद हवा आहे. मोदीजी माझ्यावर आरोप करतील आणि मी त्यांच्यावर करेन, असे राहुल म्हणाले. ज्या दिवशी ते वादविवादाला येतील, त्या दिवशी देशाला कळेल- कोण परदेशी शक्तींच्या नियंत्रणात आहे, कोण राष्ट्रविरोधी आहे, कधीपासून आहे, हे सगळे या फोनमध्ये आहे, असा दावा त्यांनी केला.
मोदीजींसोबत वादविवाद झाला तर त्यांचे राजकीय करिअर संपेल, हे त्यांनाही माहीत आहे आणि मलाही, असेही ते एका व्हिडिओ संदेशात म्हणाले. त्यांनी टेलिप्रॉम्प्टरवरूनही टोला मारला. मोदीजी, तुमच्याच गोदी मीडियाच्या दिवाळी कार्यक्रमातही तुम्ही टेलिप्रॉम्प्टर वापरला ? लोक तुमचे, मंच तुमचा, वातावरण तुमचे, तरीही स्क्रिप्ट लागते ? हरकत नाही. वादविवादालाही टेलिप्रॉम्प्टर घेऊन या, तुमच्या आवडीचा न्यायाधीशही बसवा. फक्त या, एवढेच. देशाला जाणून घ्यायचे आहे –

खरा गद्दार कोण आहे?
हा पहिलाच आरोप नाही. 2023 मध्येही त्यांनी आपल्या फोनमध्ये इस्रायली पेगासस स्पायवेअर असल्याचा दावा केला होता. गुप्तचर अधिकार्‍यांनीच मला फोनवर बोलताना काळजी घ्या, आम्ही रेकॉर्ड करत आहोत, असे सांगितले होते, असे ते तेव्हा म्हणाले होते. केंद्र सरकारने हे आरोप तेव्हाही फेटाळले होते.
पार्श्वभूमी काय ?
हा वाद नुकत्याच बिहार निवडणुकीतील निकालानंतर आणि मोदींनी राहुल यांच्यावर केलेल्या दिमागी नक्षल या टीकेनंतर अधिक पेटला आहे. राहुल गांधी यांनी याआधीही मोदींना वादविवादात हरवायला मला फक्त 5 मिनिटे लागतील असा दावा केला होता. मोदींनी मात्र या आव्हानाला आतापर्यंत प्रत्यक्ष उत्तर दिलेले नाही.

 

My phone is being tapped by Modi: Rahul Gandhi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *