नांदगाव मनमाड महामार्गावर कंटेनर मोटारसायकल अपघातात एकाचा मृत्यू
मनमाड : प्रतिनिधी
मनमाड नांदगाव रोडवरील बुरकुलवाडी परिसरात असलेल्या हनुमान मंदिरासमोर मोटारसायकल व कंटेनरच्या अपघातात नागापुर येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असुन अपघात होताच येथील रहिवासी असलेले उपजिल्हा रुग्णालय समितीचे सदस्य दिनेश घुगे यांनी स्थानिकांना सोबत घेऊन तात्काळ मदतकार्य सुरू केले रुग्णवाहिका बोलावुन मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला तर पोलीसांना कळवण्यात आले तरुण हा नागापुर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली असुन पोलिस पुढील तपास करत आहे.मनमाड नांदगाव महामार्ग चौपदरीकरणं झाल्यापासून या महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे जळगाव संभाजीनगर जाणाऱ्या गाड्याची वाहतूक यासह इंधन कंपनीच्या टॅंकर ची मोठ्या प्रमाणावर वाहतूक या महामार्गावर आहे.
नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार नाशिक : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या नाशिक महानगर जिल्ह्याची सन…
मंत्रिमंडळाचा निर्णय; दुकानदारांमध्ये नाराजी नाशिक : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या…
नगरविकासकडून निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर नाशिक : प्रतिनिधी शहरात होणार्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या…
अफवांची गावभर चर्चा; ग्रामीण भागात नागरिकांचा जागता पहारा निफाड : तालुका प्रतिनिधी गेल्या काही दशकापासून…
मुख्याधिकारी कदम यांची धाडसी कारवाई सिन्नर : प्रतिनिधी अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने आठवडाभर अगोदर नोटिसा…
गुजरातच्या व्यक्तीने त्यावेळी संपर्क केल्याची माजी आमदार चव्हाण यांची माहिती सटाणा ः प्रतिनिधी ईव्हीएम मॅनेज…