filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 47;
मनमाड, आमोदे परिसरात गारपीट, पिकांचे नुकसान
मनमाड : प्रतिनिधी
शहर परिसरात सोमवारी (दि. 5) विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. या पावसाने छोट्या-मोठ्या व्यापार्यांची धावपळ झाली, तर शेतकर्यांचे कांदा पिकासह इतर नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे आधीच संकटात असलेला बळीराजा अडचणीत सापडला आहे.
हवामान खात्याने येत्या 10 मेपर्यंत राज्यात विजांचा कडकडाट, वादळी वार्यासह गारपिटीची शक्यता वर्तवली होती. मनमाड शहरासह परिसरात सोमवारी दुपारी एकच्या सुमारास आभाळ भरून आले.त्यानंतर विजांचा कडकडाट व वादळी वारा सुरू झाला आणि पावसाला सुरुवात झाली. काही वेळ पाऊस झाल्यानंतर गारा पडायला लागल्या. पावसामुळे व्यापारी वर्गाची धावपळ झाली. शेतकर्यांनी काढून ठेवलेल्या कांद्याचे काही ठिकाणी नुकसान झाले.अवकाळी पावसामुळे बळीराजा आणखी संकटात सापडला आहे.
कांदा, मका पिकांचे नुकसान
नांदगाव प्रतिनिधी : नांदगाव तालुक्यातील आमोदे परिसरात सोमवारी बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्यांची तारांबळ उडाली. पावसासह गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परिसरात दुपारी तीननंतर हवामानात अचानक बदल होत पावसाचे वातावरण तयार झाले. अचानक आलेल्या या पावसाबरोबरच गारपिटीमुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेण्याची वेळ शेतकर्यांवर येऊन ठेपली. सध्या आमोदे परिसरात कांदाकाढणीसह मका सोगणीला वेग आला आहे. त्यात बेमोसमी पावसाने वादळी वार्यासह जोरदार हजेरी लावल्याने पिके पूर्ण भिजली.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…