सीतासरोवरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

नाशिक : प्रतिनिधी
म्हसरूळ परिसरातील सीतासरोवरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताच्या तोंडातून फेस आल्याचे आढळल्यानेे हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांना मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहाच्या आसपास ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांनी याबाबत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असल्याचे सांगितले. ही घटना घातपात आहे की अपघात, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाणे तपास करत आहे.

प्राचीन सीतासरोवराला नशेबाजांचे ग्रहण 

म्हसरूळ परिसरातील या अतिप्राचीन सीतासरोवरास अनन्यसाधारण असे पौराणिक महत्त्व आहे. मात्र, या वास्तूला मद्यपी व नशेबाजांचे ग्रहण लागल्याचे दिसते. सीतासरोवर येथील सभामंडपाचा आडोसा घेत अनेक मद्यपी व नशेबाज सर्रास पावित्र्यहनन करताना दिसत आहेत. पूर्वी येणारे-जाणारे वाटसरू सीतासरोवरावर टवाळखोरांना टोकत असत. मात्र, आता सभामंडपामुळे असे टवाळखोर दिसत नाहीत.

पोलिसांनी गस्त वाढवावी

या सरोवरावर महादेवाची पिंडी, मारुतीची पुरातन मूर्ती आहे. काही भक्त-भाविक याठिकाणी नित्य पूजेसाठी येतात. मात्र, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात विजेचे खांब, तसेच पथदीप वाढवून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रात्री गस्त वाढविण्याची मागणीदेखील केली आहे.

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago