नाशिक

अनकवाडे शिवारात विहिरीत उतरले इंधन

भारत पेट्रोलियमच्या पाइपलाइन गळतीमुळे नुकसानीचा दावा

मनमाड : आमिन शेख
शहरानजीक असलेल्या अनकवाडे हद्दीतील शेतकरी संपत चव्हाण यांच्या विहिरीत डिझेल व पेट्रोल उतरल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारत पेट्रोलियम कंपनीच्या पाइपलाइन गळतीमुळे ते उतरले की, कोणीतरी खोडसाळपणा करून डिझेल-पेट्रोल विहिरीत सोडले, याबाबत शोध सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच भारत पेट्रोलियमच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली व शोधमोहीम सुरू केली. मात्र, सायंकाळपर्यंत या विहिरीत पेट्रोल-डिझेल कुठून आले, हे समजलेच नाही. पेट्रोलियम कंपनीच्या पाइपलाइन गळतीमुळेच विहिरीत इंधन उतरल्याने माझे नुकसान झाल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनमाड येथे इंडियन ऑइल व हिंदुस्थान पेट्रोलियम या इंधन कंपन्यांचे प्लांट आहेत. यात मुंबईवरून थेट मनमाडला पेट्रोल, डिझेल व केरोसीनचा पुरवठा करण्यात येतो. मनमाडनजीक असलेल्या अनकवाडे शिवारात संपत चव्हाण यांच्या शेतालगत भारत पेट्रोलियमची इंधन पुरवठा करणारी पाइपलाइन गेलेली आहे. चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत उन्हाळा असल्याने जेमतेम पाणी शिल्लक आहे. यात जवळपास चार ते साडेचार फूट पेट्रोल व डिझेलचा थर आढळला. याबाबत चव्हाण यांनी पेट्रोलियम कंपनीशी संपर्क साधून माझ्या विहिरीत इंधन उतरल्याचा दावा केला. मात्र, इंधन कंपन्यांकडून ही गोष्ट शक्य नाही. गळती असेल तर अत्याधुनिक मशिनरीद्वारे तत्काळ समजले असते. तरीही सखोल तपास करून निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतली.या घटनेची माहिती मिळताच भारत पेट्रोलियम कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.
सुरुवातीला विहिरीची तपासणी करून तीत उतरलेले पेट्रोल, डिझेल व्ह्यॅक्यूम गाडीद्वारे काढून घेण्यात आले. यानंतर पाइपलाइन व विहिरीच्या आजूबाजूला पोकलेनद्वारे दहा फूट खोल खड्डा खोदून खरोखर पाइपलाइनला गळती आहे का, असेल तर कोणत्या दिशेने पेट्रोल-डिझेल विहिरीत झिरपले, याचा तपास कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून करण्यात येत आहे. पाइपलाइन गळतीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले असेल, तर आम्ही भरपाई देऊ, असे अधिकार्‍यांतर्फे सांगण्यात आले.

भारत पेट्रोलियमने भरपाई द्यावी

मनमाडला भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल, डिझेल व केरोसीन पुरवठा करणारी पाइपलाइन आमच्या शेतातून गेली आहे. याआधी अनेकदा पाइपलाइनला गळती झाली होती. या गळतीमुळेच माझ्या विहिरीत पेट्रोल- डिझेल उतरले. शिल्लक सर्व पाणी दूषित झाले. आम्हाला प्यायला व जनावरांना पिण्यासाठीदेखील आता पाणी नाही. भविष्यात हा प्रकार कधी थांबेल, याची शाश्वती नाही. भारत पेट्रोलियम कंपनीने मला भरपाई द्यावी.
– संपत चव्हाण,  शेतकरी

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago