नाशिक ः प्रतिनिधी
नरक चतुर्दशी, ज्याला छोटी दिवाळी किंवा काली चौदस असेही ओळखले जाते. हा दिवाळी सणाचा दुसरा दिवस मानला जातो. काल नरक चतुर्दशीचा उत्साह शहरात दिसला. अभ्यंगस्नानासह यमदीपदानही करण्यात आले.
नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 5.13 ते 6.25 या कालावधीत होता. या कालावधीत अभ्यंगस्नान अत्यंत फलदायी मानले जाते. कुटुंबातील मुले, ज्येष्ठांना अभ्यंगस्नान घालण्यात आले. यमदीपदानाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5.47 ते 7.03 या कालावधीत होता. या कालावधीत यमराजाची पूजा करून दीपदान केल्याने अकाली मृत्यूचे भय नष्ट होतेे आणि कुटुंबाला सुख-समृद्धी प्राप्त होते, अशी धारणा असल्याने सायंकाळी यमदीपदान करण्यात आले. यावेळी फटाके
फोेडण्यात आले. आज (दि. 21) लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. त्यानंतर दिवाळी पाडवा आणि भाऊबीज साजरी केली जाणार आहे. सणाच्या निमित्ताने एकत्र येत दिवाळी साजरी केली जात असून, देशभरात दिवाळीसणाचा आनंद मंगलमय वातावरणात फराळ,
फटाके फोडणे, आतषबाजी करून घेतला जात आहे.
पौराणिक कथेनुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून 16 हजार स्त्रियांना मुक्त केले. या विजयाच्या स्मरणार्थ नरक चतुर्दशी साजरी केली जाते. शहरात अभ्यंगस्नान, यमदीपदान, पारंपरिक फराळाची तयारी करण्यात आली होती. नागरिकांनी घराघरांत पणत्या लावून, सजावट करून व फटाके फोडून सणाचा आनंद साजरा केला.
कांदा प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्ध नग्न आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाचा आंदोलकांना पाठिंबा…
शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू सिडको : दिलीपराज सोनार जुने सिडको परिसरातील शॉपिंग…
लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा…
राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत सातपूर : सातपूर…
जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दाखल करण्यास नकार — छावा क्रांतीवीर सेनेकडून रुग्णालय प्रशासनाचा तीव्र निषेध!…
सिडको : विशेष प्रतिनिधी वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून…