नाशिक

नाशिक भूषण पुरस्कार पीयूष सोमाणी यांना जाहीर

रोटरी भूषण पुरस्कार डॉ. नेहेते, शिरोरे यांना प्रदान करणार

17 एप्रिलला सन्मान सोहळा

नाशिक : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘नाशिक भूषण 2025-26’ पुरस्कार उद्योग व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे उद्योजक पीयूष सोमाणी यांना जाहीर झाला आहे. ‘रोटरी भूषण’ पुरस्कार डॉ. राजेंद्र नेहेते व विलास शिरोरे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा येत्या शुक्रवारी, दि. 17 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता प्रख्यात आयटीतज्ज्ञ व लेखक डॉ. उदय निरगुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
नाशिक ही जन्मभूमी किंवा कर्मभूमी असलेल्या आणि आपल्या कर्तृत्वाने शहराचे नाव उज्ज्वल करणार्‍या व्यक्तींना गौरविण्याच्या उद्देशाने ‘नाशिक भूषण’ पुरस्काराचा उपक्रम रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे 1996-97 पासून राबविण्यात येत आहे. यापूर्वी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर, प्रा. वसंत कानेटकर, डॉ. वसंतराव गुप्ते, विनायकराव पाटील, शांताबाई दाणी, डॉ. वसंतराव पवार, बापू नाडकर्णी व कुसुमताई पटवर्धन यांसारख्या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यंदाचे पुरस्कार विजेते पीयूष सोमाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. ‘ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. त्यांनी उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात केलेले योगदान लक्षणीय मानले जाते.
दरम्यान, या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर, सचिव सीए रेखा पटवर्धन, प्रकल्प सचिव मकरंद चिंधडे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सीए उदयराज पटवर्धन व जनसंपर्क संचालक अ‍ॅड. विद्युल्लता तातेड यांनी केले आहे.

Nashik Bhushan Award announced for Piyush Somani

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago