नाशिक

पळसेत पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

शेतकरी वर्गाचे उभे पीक पाण्यात, जमिनीलाही भगदाड

नाशिकरोड : प्रतिनिधी
सिन्नर एमआयडीसी परिसराला पाणीपुरवठा करणारी पळसे गावातून जाणारी मुख्य पाइपलाइन चार महिन्यांत दोन वेळा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे. लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. पाइपलाइन फुटल्याने अनेक शेतकर्‍यांची पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. जमिनीलादेखील मोठे भगदाड पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. या घटनेमुळे काही काळ शेतकरी वर्गासह ज्येष्ठ नागरिक तथा शेतकरी विष्णू गायखे याच्या घराला धोका निर्माण होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सिन्नर एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी पळसेत दारणा नदीवरून 1988 साली पाइपलाइन करण्यात आली आली. या पाइपलाइनद्वारे सिन्नर एमआयडीसीसह शहरालादेखील काही प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. काल दुपारी चारच्या सुमारास विष्णू गायखे गट नं. 1186 मध्ये रहिवासी असणारा गायखे परिवार हा आवाज कसला येतो म्हणून घाबरून घराबाहेर आले, तर घराशेजारी कैलास गायखे याच्या गट नं. 1187 मधून जाणारी पाइपलाइन फुटल्याचे दिसले. प्रसंगावधान राखून विष्णू गायखे यांनी संबधित एमआयडीसी विभागाला दूरध्वनीवरून परिस्थितीची माहिती दिली.
पाइपलाइन फुटल्यानंतर मोठ्या दाबाने पाणी बाहेर पडत रस्त्यावर साचू लागले. काही ठिकाणी पाण्याचे लोट वाहू लागल्याने जगन गायखे यांच्या गट नं. 1180 मध्ये कोबीच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जवळपास लाख दीड लाखाचे नुकसान झाले. शिवाय अंबादास गायखे यांच्या शेतातही पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने पिकाचे नुकसान झाले आहे.
रस्त्यावरून जाणार्‍या वाहनचालकांना पाणी साचल्याने वाहने ने-आण करण्यास अडचणींचा सामना करावा लागला. काही भागांत चिखल व खड्डे निर्माण झाल्याने अपघाताचा धोका वाढला होता. स्थानिक नागरिकांनी ही बाब तत्काळ संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
माहिती मिळताच संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाणीपुरवठा तातडीने बंद करून गळती रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. पाइपलाइन फुटण्यामागील कारणांबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. जुन्या झालेल्या पाइपलाइनची झीज, वाढलेला पाण्याचा दाब किंवा देखभालीचा अभाव ही संभाव्य कारणे असल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाने याबाबत चौकशी सुरू केली असल्याचे बोलले जाते.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टंचाई भासत असताना अशा प्रकारे लाखो लिटर पाणी वाया जाणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पाइपलाइनची नियमित तपासणी व दुरुस्ती करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पिकाची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही शेतकरी विष्णू गायखे, कैलास गायखे, अंबादास गायखे, जगन गायखे आदींसह नागरिकांनी केली आहे.

पळसे गावातील दारणा नदीपात्रातून जवळपास 30-35 वर्षांपासून
सिन्नर एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन जात आहे. मात्र, आज ती जीर्ण झाल्याने चार महिन्यांत दोनदा पाण्याचा दाब वाढल्याने फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. शेतात असणार्‍या पिकांसह घरालादेखील मोठा धोका निर्माण झाला आहे. दिवस ही घटना घडली, पण रात्रीच्या वेळी असा प्रसंग घडला असता तर काय झाले असते? आम्ही दिसलोच नसतो. एवढा मोठा पाण्याचा दाब पाइपलाइनवर दिसला. संबंधित प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाला पिकाची भरपाई मिळावी.
– विष्णू गायखे, नुकसानग्रस्त शेतकरी, पळसे

Pipeline bursts in Palas; lakhs of liters of water wasted

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago