नाशिक

नाशिक बाजार समितीचे उत्पन्न 40 लाखांनी घटले

देवीदास पिंगळेंचा आरोप; पणनमंत्र्यांचे तीन आठवड्यांत चौकशी अहवाल देण्याचे आदेश

पंचवटी : वार्ताहर
मागील आर्थिक वर्ष 2024 -25 मध्ये एप्रिल महिन्यात दोन कोटी तेवीस लाख रुपये होते. मात्र, सत्तांतर होताच आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एप्रिल महिन्यात एक कोटी नव्वद लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत गत वर्षी जवळपास 40 लाख रुपयांनी उत्पन्न घटले आहे. नाशिक बाजार समितीत सध्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्यानेच उत्पन्नात घट झाली असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार तथा माजी सभापती देवीदास पिंगळे यांनी केला आहे. याबाबत पिंगळे यांनी राज्याचे पणन व राज्यशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांना पत्रव्यवहार केला होता, त्या अनुषंगाने तीन दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मंत्री रावल यांनी आदेशित केले आहे. आता या अहवालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात जिल्हाभरातून हजारो शेतकरी भाजीपाला व फळभाज्या विक्रीसाठी घेऊन येत असतात. तसेच, पेठरोडवरील शरदचंद्रजी मार्केट यार्डामध्ये कांदा, बटाटा, लसूण डाळिंब, इतर फळे व अन्नधान्याची मोठी उलाढाल
होत असते.

बाजार समितीतील सभापती व संचालक यांनी काही कर्मचार्‍यांच्या मदतीने बाजार समितीत जमा होणारे उत्पन्न हे रोख स्वरुपात वसुल केले आहे. संबधीतांना कोणतीही पावती न देता सदर वसुल परस्पर सभापती व संचालक यांच्यात वाटुन घेतला जात आहे. तसेच बाजार समितीत असलेले आरक्षित भूखंड ज्याचा वापर शेतकरी व व्यापारी यांच्या वाहनांच्या पार्किंग साठी केला जातो. सदर भुखंड हे बाजार समिती सभापती व संचालक कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या जवळच्या व पैसे देणा-या बाहेरच्या लोकांना 11 वर्षाच्या करारावर देत आहे. असे झाले तर शेतक-यांचे व व्यापा-याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. पुढील काळात बाजार समितीचे भवितव्य अंधारमय आहे.
– देविदास पिंगळे, माजी सभापती

अवकाळी पावसामुळे उत्पन्नात घट

बाजार समितीला शेतकर्‍यांच्या येणार्‍या मालाच्या दराच्या टक्केवारीने बाजार

फीमधून उत्पन्न मिळत असते. मात्र, मागील काळात पाऊस पडल्यामुळे पिकांचे

नुकसान झाल्याने शेतमालाची आवक घटली. त्यामुळे शेतमालाला बाजारभाव

कमी झाला. त्याचा परिणाम बाजार समितीच्या फी वसुलीतदेखील झाल्याने

बाजार समितीच्या उत्पन्नात घट झाली आहे.

– कल्पना चुंभळे, सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

Gavkari Admin

Recent Posts

रुग्णालयातून बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न फसला.. तरुणाला नागरिकांनी दिला चोप

मनमाड: प्रतिनिधी मागील काही दिवसांपूर्वी मनमाड शहरातील सिकंदर नगर भागातील पाच वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा…

7 hours ago

राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात

राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात शहापूर/ साजिद शेख गेल्याकाही दिवसांपासून विधीमंडळात एक-…

17 hours ago

जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान

जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान: दोन रुग्णांचा मृत्यू, 14 रुग्णांवर   उपचार सुरू मोखाडा:   …

21 hours ago

आधी प्रेम… मग लिव्ह इन अन नंतर …

आधी प्रेम... मग लिव्ह इन अन नंतर ... शहापूर/साजिद शेख २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला अश्लील…

1 day ago

दिंडोरी जवळ भीषण अपघातात सात जण ठार

  दिंडोरी येथील अपघातात सात ठार अपघातात तीन महिला, तीन पुरुष एक बालकाचा समावेश दिंडोरी…

1 day ago

प्रेम अन साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी… प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले…

साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…

3 days ago