नाशिक

नाशिक मेट्रोवर आश्वासनांची धूळच

खा. वाजेंचा संसदेत सवाल; मंत्रालयाकडून थंडा प्रतिसाद

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहराच्या झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येला आणि वाढत्या वाहतूक कोंडीला दिलासा देणार्‍या नाशिक मेट्रो प्रकल्पाबाबत केंद्र सरकारची भूमिका अजूनही अनिश्चित आणि उदासीन असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या थेट आणि सविस्तर प्रश्नावर मंत्रालयाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही.
लोकसभेत गुरुवारी (दि.29) विचारण्यात आलेल्या अतारांकित प्रश्नामध्ये खा. वाजे यांनी नाशिक मेट्रो प्रकल्पाची घोषणा, सध्याची स्थिती, आवश्यक मंजुरी, निधी, अडथळे, मेट्रो निओचा निर्णय, तसेच 2027 च्या कुंभमेळ्यापूर्वी मेट्रो कार्यान्वित करण्याबाबत सरकारची भूमिका या सहा अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट उत्तर मागितले. मात्र, गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाकडून केवळ मेट्रो हा राज्याचा विषय आहे, प्रकल्प खर्चिक आहे आणि प्रस्ताव तपासणी करून परत पाठवण्यात आल्याचे असे सर्वसाधारण आणि गोलमाल करून सांगण्यात आले. मात्र, केंद्राकडून ना कालमर्यादा, ना निर्णय, ना स्पष्ट दिशा असा हा प्रतिसाद नाशिककरांच्या अपेक्षांवर पाणी फेरणारा ठरतो आहे. बजेटमध्ये नाव, पण जमिनीवर काहीच नाही. नाशिक मेट्रो प्रकल्पाचा उल्लेख 2021-22 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात झालेला असतानाही प्रत्यक्षात आजतागायत काहीच ठोस पाऊल उचललेले नाही, ही वस्तुस्थिती मंत्रालयाच्या उत्तरातूनच समोर आली आहे. राज्य सरकारने सादर केलेला मेट्रो निओचा प्रस्ताव केंद्राने निरीक्षणांसह परत पाठवला. मात्र, त्या निरीक्षणांवर पुढील काय कार्यवाही झाली, याबाबत केंद्राने मौन बाळगले असल्याचे खा. वाजे यांनी म्हटले.

संसदेत सातत्याने आवाज

खा. राजाभाऊ वाजे यांनी या विषयावर सातत्याने संसदेत आवाज उठवला आहे. केवळ कागदी उत्तरे स्वीकारण्यास नकार दिला आहे. नाशिक मेट्रो हा केवळ विकास प्रकल्प नाही, तर नाशिकच्या भविष्यासाठीचा कणा आहे. केंद्र सरकारने वेळकाढूपणा थांबवून ठोस निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी यापूर्वीही मांडली आहे.

नाशिककरांचा सवाल, निर्णय कधी?

नाशिक शहर वाहतूक कोंडी, वाढती लोकसंख्या आणि अपुर्‍या सार्वजनिक वाहतुकीमुळे हैराण झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारमधील फाइलफेरीत नाशिक मेट्रो अडकून पडणे, हे नाशिकच्या विकासावर अन्याय करणारे ठरत आहे.

वाढते शहरीकरण, अपुरे रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, प्रदूषण यांचा भविष्याचा विचार करता मेट्रो किंवा निओ मेट्रो हे प्रकल्प शहरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. बजेटमध्ये जाहीर करूनही सरकार टाळाटाळ करत असेल तर हे निराशाजनक आणि नाशिककरांच्या विश्वासाला तडा देणारे आहे. तरी यासाठी लढा सुरूच राहणार आहे.
– राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक

Nashik Metro promises are just dust

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

5 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

5 hours ago