नाशिक: प्रतिनिधी
शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नाही, आज सकाळी गोदावरी काठी असलेल्या बालाजी कोट भागात एका मनपा कर्मचाऱ्याचा खून झाल्याची घटना घडली. सनी जॉन असे या कर्मचाऱ्यांचे नाव असून, त्याची निर्घृण हत्या करण्यात आली असली तरी खुनाचे कारण अस्पष्ट आहे, याबाबत सरकार वाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.