ठाणे अखेर शिंदेंकडेच, नरेश म्हस्के यांना उमेदवारी

नाशिक : प्रतिनिधी

ठाणे लोकसभा मतदार संघाचा तिढा अखेर सुटला असून, ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडेच  राहणार असून, ठाणे मतदार संघातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, कल्याण मधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाण्यात आता राजन विचारे यांच्याशी म्हस्के यांची लढत होईल, ठाण्यात भाजपाने देखील  जोर लावला होता, मात्र ठाणे शिंदे गटाकडे राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *