राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांत नाशिक, नागपूर, पुण्याची चमक

♦ बुद्धिबळाचे दोन्ही अर्जुन महाराष्ट्राच्या खेळाडूंना प्रदान
♦ नाशिकच्या विदित गुजराथीचा सन्मान

नवी दिल्ली : प्रतिनिधी
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार-2025 चा वितरण सोहळा शुक्रवारी राष्ट्रपती भवनात पार पडला, त्यात महाराष्ट्राने सवार्ंत लक्षवेधी ठसा उमटवला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिकचे ग्रँडमास्टर विदित संतोष गुजराथी आणि नागपूरची ग्रँडमास्टर दिव्या जितेंद्र देशमुख यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बुद्धिबळात महाराष्ट्राच्या दोन्ही खेळाडूंना एकाच वर्षी अर्जुन मिळणे, ही राज्यासाठी ऐतिहासिक बाब ठरली आहे. हे पुरस्कार 13 नोव्हेंबरला दिले गेले, पण जाहीर 18 ऑगस्ट 2026 रोजी झाले.  नाशिक-नागपूर-पुण्याची चमक
होते. निवड समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा होते. यंदा एकूण 17 खेळाडूंना अर्जुन जाहीर झाला होता, त्यापैकी 15 जण सोहळ्याला उपस्थित होते – बॅडमिंटनपटू ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जपान मास्टर्समध्ये खेळत असल्याने आल्या नव्हत्या. यंदा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणालाही दिला गेला नाही, 2014 नंतर असे पहिल्यांदाच घडले आहे.
अर्जुन पुरस्कारासोबत खेळाडूंना 15 लाख रुपये, कांस्य मूर्ती आणि मानपत्र मिळते. महाराष्ट्रासाठी हा दिवस केवळ दोन पदकांचा नाही, तर नाशिकची मेहनत, नागपूरची जिद्द आणि पुण्याचे संस्थात्मक काम – या तिन्हींचा राष्ट्रीय गौरव झाला, असा दिवस ठरला. विदितने 2024 च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय संघात महत्त्वाची भूमिका बजावली होती. फिडे ग्रँड स्विस, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सातत्यपूर्ण कामगिरीसाठी त्याची निवड झाली. 6 वर्षांचा असताना बुद्धिबळ शिकायला सुरुवात करणार्‍या विदितने नाशिकच्या गल्लीतून जागतिक पटलापर्यंतचा प्रवास केला आहे. दुसरीकडे 20 वर्षीय दिव्याने 2025 मध्ये जॉर्जियातील बाटुमी येथे झालेल्या फिडे महिला विश्वचषकात अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हंपीचा अंतिम टायब्रेकमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले होते. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आणि त्याचमुळे ती ग्रँडमास्टरही बनली. ऑलिम्पियाड आणि आशियाई महिला अजिंक्यपदातील कामगिरीचाही तिच्या निवडीत वाटा आहे. महाराष्ट्राचा डंका एवढ्यावरच थांबला नाही. नेमबाजी प्रशिक्षक नेहा नंदकुमार चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित) मिळाला, तर पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक नोड या संस्थेला राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार मिळाला. जखमी / दिव्यांग सैनिकांना पॅरा-स्पोर्ट्सद्वारे पुनर्वसन, प्रशिक्षण आणि स्पर्धांसाठी तयार करण्याचे काम ही संस्था करते. या पुरस्काराचे प्रतिनिधित्व लेफ्टनंट कर्नल दलजीत सिंह यांनी केले.

Nashik, Nagpur, and Pune shine in National Sports Awards

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *