नाशिक

नाशिकरोड कारागृह अधिकार्‍यांची संशयितासोबत कथित पार्टी

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल उलटसुलट चर्चा

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील काही वरिष्ठ अधिकार्‍यांचा एका संशयितासोबत कथितरीत्या पार्टी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कारागृह प्रशासनात चर्चेला उधाण आले आहे. संबंधित व्हिडिओमध्ये कारागृह परिसरातील शासकीय निवासस्थानासमोर काही अधिकारी व संशयित एकत्र दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित संशयित हा फसवणुकीच्या प्रकरणात यापूर्वी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाशी संबंधित राहिलेला आहे. सध्या जामिनावर बाहेर असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही वरिष्ठ अधिकारी त्याच्यासोबत अनौपचारिक वातावरणात दिसून येत असल्याची चर्चा सुरू आहे. या कथित पार्टीदरम्यान मद्यपान झाल्याचाही दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. मात्र, या सर्व बाबींना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. विशेष म्हणजे, हा प्रकार कारागृह परिसरातील शासकीय निवासस्थानाजवळ घडल्याचे बोलले जात असल्याने सुरक्षाव्यवस्था आणि शासकीय शिस्त यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, संबंधित अधिकार्‍यांपैकी एका अधिकार्‍यावर यापूर्वीही प्रशासकीय स्तरावर कारवाई झाल्याची चर्चा कारागृह वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. या प्रकरणाबाबत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक अरुणा मुगुटराव यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच कारागृह प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून संबंधित व्हिडिओची सत्यता, त्यामागील परिस्थिती आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत चौकशीनंतरच स्पष्टता येणार असल्याचे बोलले जात आहे.

Nashik Road Jail officials allegedly party with suspect

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोहाडीत मोहाडमल्ल महाराजांची शतकाची रोठ परंपरा

लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…

18 hours ago

सिंहस्थाच्या नावाने त्र्यंबकेश्वरचे रस्ते गाळात

ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…

18 hours ago

पावसा पावसा… तू पण!

नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…

18 hours ago

अब्दुल्लांचे आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…

18 hours ago

जीवघेणे खड्डे !

पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…

18 hours ago

खड्डेमुक्तीसाठी मंत्री महाजनांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा अधिकार्‍यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…

19 hours ago