राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

अमेरिका-इराण युद्ध संपण्याची चिन्हे

शांतता कराराच्या हालचाली गतिमान, होर्मुझ पुन्हा उघडणार

तेहरान/वॉशिंग्टन/नवी दिल्ली ।
गेल्या तीन महिन्यांपासून मध्यपूर्वेत सुरू असलेले अमेरिका-इराण युद्ध अखेर थांबण्याची सकारात्मक चिन्हे निर्माण झाली आहेत. अमेरिका आणि इराण ऐतिहासिक शांतता कराराच्या (पीस डील) अत्यंत जवळ पोहोचले असल्याचे संकेत दोन्ही देशांनी रविवारी दिले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून जाहीर केले की, दोन्ही देशांमध्ये एका सामंजस्य करारावर (एमओयु) ’मोठ्या प्रमाणावर वाटाघाटी’ पूर्ण झाल्या आहेत. पाकिस्तानच्या मध्यस्थीने हा करार आकारास येत आहे. यामुळे जागतिक ऊर्जा संकटाला कारणीभूत ठरलेला ’स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ हा सागरी मार्ग पुन्हा खुला होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या मोठ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) किमतीत तब्बल 7 टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे.
या प्रस्तावित अंतरिम शांतता करारामध्ये प्रामुख्याने 60 दिवसांच्या युद्धबंदीचा (सीझफायर) समावेश आहे. या 60 दिवसांच्या काळात इराणला पुन्हा आपले तेल निर्यात करण्याची परवानगी दिली जाईल, तसेच सागरी मार्गातील सुरुंग हटवण्याचे काम केले जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इराण आपल्याकडील समृद्ध युरेनियमचा साठा सोडण्यास तयार झाल्याचे वृत्त आहे; मात्र हे युरेनियम कुठे आणि कसे पाठवले जाईल, हे अद्याप अस्पष्ट आहे. इराणच्या ’तस्नीम’ या निम-शासकीय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, करार पूर्ण झाल्यास पुढील 30 दिवसांत ’स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधील जहाजांची वाहतूक युद्धपूर्व पातळीवर येईल. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आखाती देशांचे नेते आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी सखोल चर्चा केल्यानंतरच या कराराचे संकेत दिले आहेत.एकीकडे सकारात्मक चर्चा सुरू असताना इराणने मात्र अमेरिकेचे दावे पूर्णपणे मान्य केलेले नाहीत. इराणच्या ’फार्स’ वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, करार पूर्णत्वाच्या जवळ असल्याचा ट्रम्प यांचा दावा वास्तवाशी सुसंगत नाही. ’स्ट्रेट ऑफ होर्मुझ’वर अजूनही इराणचेच नियंत्रण आहे. जोपर्यंत अमेरिका आपली नौदलाची नाकेबंदी (नेव्हल ब्लॉकेड) पूर्णपणे उठवत नाही, तोपर्यंत या सागरी मार्गाच्या स्थितीत कोणताही बदल होणार नाही, अशी ठाम भूमिका तेहरानने घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष आता अमेरिकेच्या पुढील पाऊलाकडे लागले आहे. ट्रम्प हे या युद्धाबाबत आणि कराराबाबत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या जागतिक घडामोडींचे केंद्र सध्या भारताची राजधानी नवी दिल्ली येथेही पाहायला मिळत आहे. 4 दिवसांच्या भारत दौर्‍यावर असलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या 48 तासांत युद्धातील वाटाघाटींमध्ये मोठी प्रगती झाली आहे. पुढील काही तासांतच इराणबाबत जगासाठी मोठी आणि चांगली बातमी येऊ शकते. 24 तासांच्या आत संयुक्त घोषणा होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मात्र, त्याच वेळी त्यांनी इराणवर जगभरात दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोपही केला.

Signs of an end to the US-Iran war

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोहाडीत मोहाडमल्ल महाराजांची शतकाची रोठ परंपरा

लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…

17 hours ago

सिंहस्थाच्या नावाने त्र्यंबकेश्वरचे रस्ते गाळात

ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…

17 hours ago

पावसा पावसा… तू पण!

नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…

17 hours ago

अब्दुल्लांचे आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…

18 hours ago

जीवघेणे खड्डे !

पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…

18 hours ago

खड्डेमुक्तीसाठी मंत्री महाजनांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा अधिकार्‍यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…

18 hours ago