नाशिक

नाशिक विकासाचे ग्रोथ इंजिन ठरेल

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 14 हजार कोटींचे सामंजस्य करार

नाशिक/ सिडको : प्रतिनिधी
महिंद्रा अँड महिंद्रा या प्रमुख उद्योग समूहाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नाशिकमध्ये उभारला जाणार आहे. त्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक जागा उपलब्ध होताच प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच होईल. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले नाशिक शहर यापुढील काळात विकासाचे ग्रोथ इंजिन ठरेल. विकासाच्या बाबतीत आता नाशिक थांबणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
हॉटेल ताज येथे आयोजित कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक शिखर परिषद-2026 च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, महापौर हिमगौरी आहेर-आडके, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध तीनशेहून अधिक उद्योजकांसोबत 13 हजार 190 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून 32 हजार रोजगारनिर्मिती होणार आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करायची आहे. त्यामध्ये भौगोलिक समतोल असावा, यादृष्टीने काम सुरू आहे. सुरुवातीला केवळ मुंबई, पुणे व महानगर प्रदेश केंद्रित विकास असे धोरण होते. राज्य शासनाने जिल्ह्याला विकासाचे केंद्र केले पाहिजे, अशी भूमिका घेतली. जिल्ह्याच्या क्षमतांचा आणि सुविधांचा उपयोग केला पाहिजे. त्यादृष्टीने केवळ मोठे उद्योगांसोबत लघुउद्योगांना प्राधान्य देण्याचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून होत आहे.
मुंबई-पुण्यानंतर आता नाशिकच्या विकासाला खर्‍या अर्थाने वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विविध लघू, मध्यम आणि मोठ्या उद्योगांच्या उभारणीमुळे जिल्हा औद्योगिकदृष्ट्या नव्या उंचीवर पोहोचण्याच्या मार्गावर आहे. कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक परिषद 2026च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासाबाबत विश्वास व्यक्त केला.आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विकासाला धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक असे त्रिसूत्री महत्त्व प्राप्त झाले आहे. सनातन परंपरा, अध्यात्म आणि संस्कृतीचा जागतिक अविष्कार असलेल्या कुंभमेळ्याला देशभरातून येणार्‍या कोट्यवधी भाविकांसाठी अधिक आकर्षक, सुव्यवस्थित आणि अभिमानास्पद बनविण्याचे आवाहन करण्यात आले. उद्योग आणि अध्यात्म यांची सांगड घालत नाशिकला जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद आले.या प्रसंगी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी यावर्षी 10 ते 12 कोटी भाविकांच्या उपस्थितीची शक्यता व्यक्त करत प्रशासन पूर्ण क्षमतेने सज्ज असल्याचे सांगितले. हा कुंभमेळा नाशिककरांसाठी मोठे आव्हान असले तरी सामूहिक प्रयत्नातून तो यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मागील काही वर्षांत उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यावर भर दिल्याचे सांगत, नाशिकमध्ये देशातील पहिले ट्रायबल क्लस्टर हब उभारले जात असल्याची माहिती दिली. जांबुटके शिवारातील हा प्रकल्प देशासाठी एक नवा प्रयोग ठरणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा चालना देणार आहे. नाशिकमध्ये 2024-25 या कालावधीत 16 हजार 111 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, त्यातून 7 हजार 566 रोजगारनिर्मिती झाली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, ग्राफाइट, व्हर्चुओसो ऑप्टी इलेक्ट्रॉनिक्स, एपिरॉक एबी, पैरासन मशीनेरी यांसारख्या कंपन्यांचा यात समावेश आहे. याशिवाय, आणखी आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्यांकडून एआय, क्लाउड आणि डेटा सेंटरसारख्या पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत, ज्यामुळे नाशिकच्या आयटी क्षेत्राला मोठी चालना मिळेल.विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील विकास कामांची माहिती दिली.विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी, बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले पुष्पक विमान प्रतिकृती देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले.
इगतपुरी, राजूर बहुला, मनमाडला एमआयडीसी
उद्योग मंत्री डॉ.सामंत म्हणाले, उद्योगाना दिले जाणारे प्रोत्साहन अनुदान पारदर्शक पद्धतीने आणि मानवी हस्तक्षेप न होता साडे चौदा हजार कोटी रुपयांचे अनुदान आतापर्यंत उद्योजकांना देण्यात आले आहे. मैत्री कक्षाच्या माध्यमातून उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यात येत आहेत. या कक्षाकडे प्राप्त अर्जांपैकी 99 टक्के अर्ज मार्गी लावले आहेत. जिल्ह्यातील इगतपुरी, राजूर बहुला, मनमाड आदी ठिकाणी एमआयडीसी साकारण्यात येणार आहे. त्यासाठी 1 हजार 300 एकर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे.

Nashik will become a growth engine for development

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago