नाशिक

श्री काळाराम मंदिरावर डौलाने फडकला धर्मध्वज

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विधिवत पूजन

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक : प्रतिनिधी
धर्मध्वजा तथा धर्मध्वज हे हिंदू धर्मात विजय, नीतिमत्ता, दैवी संरक्षण आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक असलेला पवित्र भगवा ध्वज आहे. धर्मध्वज हा मंदिराच्या कळसावर फडकवला जातो. नाशिकच्या श्री काळाराम मंदिर देवस्थानचा प्राचीन धर्मध्वज जीर्ण झाल्याने भव्य स्वरूपात नवा धर्मध्वज उभारण्यात आला आहे. पुढील वर्षी होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात बुधवारी (दि. 6) धर्मध्वज उभारणी सोहळा अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात झाला.
विशेष म्हणजे, अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या 21 फूट उंच पंचधातूच्या ध्वजस्तंभावर भगवा धर्मध्वज विधिवत पूजन करून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डौलाने फडकविण्यात आला.
या सोहळ्याप्रसंगी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, सविता रामनाथ कोविंद आणि कन्या स्वाती कोविंद तसेच महापौर हिमगौरी आडके, अयोध्या न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज, महंत सुधीरदास पुजारी, तसेच संत, महंत उपस्थित होते.
हा धर्मध्वज आध्यात्मिक तेजाचे प्रतीक आहे. धर्मध्वज हा भगवा (केशरी) रंगाचा असून, त्याचे परिमाण अंदाजे पाच फूट बाय 11 फूट असेल. या ध्वजावर भगवान हनुमानाची प्रतिमा, तसेच जय श्रीराम, ॐ आणि चिन्ह अंकित केले आहे. सनातन धर्माच्या शौर्य, अद्धा व ऊर्जा यांचे प्रतीक तर सूर्व प्रतिमा हे रघुवंशाचे प्रतीक म्हणून मंदिरावर धर्मध्वज फडकला आहे. धर्मध्वज स्थापना ही भारतीय सनातन संस्कृतीतील परंपरा असून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी आहे.यानिमित्ताने आज सकाळपासूनच वेदघोष, पूजन-विधी व धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले होते.विशेष म्हणजे याप्रसंगी 21 विविध जातींमधील दांपत्य तथा जोडप्यांच्या हस्ते विधी पूजन आणि धार्मिक सोहळा संपन्न झाला. धर्मध्वज स्थापना कार्यक्रमास सकाळी आजपासून सुरुवात झाली दुपारी चारपर्यंत विधीवत पूजन झाले, यासाठी प्रधान आचार्य म्हणून महंत सुधीरदास महाराज, पौरोहित्य शांताराम भानोसे, पं. दिनेश गायधनी यांनी केले आहे. या प्रसंगी आमदार पंकज भुजबळ, आमदार सीमा हिरे, ‘फिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण , अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील , निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपमहापौर विलास शिंदे, पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, शांताराम शास्त्री भानोसे, स्वामी अमृतानंद, वैष्णव व शैव आखाड्यांचे महंत, विश्वस्त शांताराम आवसारे, शुभम मंत्री, साधू-महंत आदीसह मान्यवर उपस्थित होते.

धर्मध्वजावर हनुमंतरायाची प्रतिमा

पुरातन ध्वज 1962 मध्ये मंदिरात स्थापित झाला होता. वातावरणातील बदलाने सद्यःस्थितीत तो जीर्ण अवस्थेत असल्याने धर्मध्वजारोहण झाले आहे. पंचधातूपासून तयार केलेल्या ध्वजस्तंभावर 5 बाय 11 फूट आकाराचा भगवा ध्वज आहे. त्याच्यावर हनुमंतरायाची प्रतिमा, तसेच सूर्यदेवतेचे ‘ॐ’ चिन्ह अंकित करण्यात आले आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि पारंपरिक अलंकरण करण्यात आले होते. या सोहळ्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला औपचारिक धार्मिक प्रारंभ झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

The religious flag was hoisted by the Doula at the Shri Kalaram Temple.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago