नवी दिल्ली : प्रतिनिधी
राजधानीत केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे आयोजित स्वच्छ भारत मिशन पुरस्कार आणि स्वच्छ
सर्वेक्षण सोहळ्यात महाराष्ट्राने पुन्हा एकदा स्वच्छतेच्या बाबतीत आपली छाप पाडली आहे. देशभरातील शहरे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे कचरामुक्त शहर आणि हागणदारीमुक्त स्थितीच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. या राष्ट्रीय सोहळ्यात घन व द्रव कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी बजावत महाराष्ट्रातील नवी मुंबईने देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत टॉप तीनमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तसेच, 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात मीरा-भाईंदरने स्वच्छ शहर श्रेणीत देशात प्रथम क्रमांक पटकावला, तर पन्हाळ्याला सुपर स्वच्छ लीग अंतर्गत कचरामुक्त आणि हागणदारीमुक्त शहराच्या उल्लेखनीय कामासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले.
या प्रतिष्ठेच्या स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक शहरानेही उल्लेखनीय झेप घेत 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गटात राष्ट्रीय पातळीवर 22 वे स्थान पटकावले आहे, जे मागील वर्षी 31 व्या स्थानी होते. याच लोकसंख्येच्या श्रेणीत नाशिकने पिंपरी-चिंचवड, पुणे आणि ठाणे यांच्या पाठोपाठ राज्यात चौथा क्रमांक मिळवला आहे. नाशिक महानगरपालिकेने सर्वेक्षणाच्या एकूण 12,500 पैकी 10,125 गुण प्राप्त केले आहेत. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे (96% गुण), रहिवासी परिसराची स्वच्छता, कचरा निर्मिती विरुद्ध प्रक्रिया, बाजारपेठांची स्वच्छता आणि जलस्रोतांचे संवर्धन या निकषांवर नाशिकने तब्बल 100 टक्के गुण मिळवून आपला दबदबा निर्माण केला आहे.
कचर्याची विल्हेवाट लावण्यात नाशिकला शून्य गुण
नाशिकने स्वच्छतेत भरीव प्रगती केली असली तरी, डम्पिंग ग्राऊंडवरील जुन्या कचर्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याच्या बाबतीत शहराला शून्य गुण मिळाले असून, प्रशासनाला भविष्यात यावर अधिक काम करण्याची गरज आहे. नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने या उणिवा दूर करत आगामी सर्वेक्षणात शहराला देशातील पहिल्या 10 स्वच्छ शहरांमध्ये आणण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित केले आहे. एकंदरीतच, एकदाच वापरल्या जाणार्या प्लास्टिकपासून मुक्ती आणि आदर्श शाश्वत कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून नाशिकसह महाराष्ट्रातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था आता राष्ट्रीय पातळीवर स्वच्छतेचे सर्वोच्च मानांकन मिळवण्यासाठी अधिक कटिबद्ध झाल्याचे या पुरस्कारांतून अधोरेखित झाले आहे.
Nashik’s remarkable leap in Swachh Bharat Mission awards
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…