ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन
पुणे :
भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (वय 75) यांच्या पार्थिवावर गुरुवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्याजवळील खडकवासला परिसरातील डोणजे (नानाची वाडी) येथील त्यांच्या फार्महाउसवर शोकाकुल वातावरणात त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. मुलगा मल्हार याने नानांच्या पार्थिवाला रात्री उशिरा मुखाग्नी दिला. यावेळी त्यांची पत्नी नीलकांती पाटेकर यांना शोक अनावर झाला. गुरुवारी सकाळी गोव्यातील डोना पावला येथील निवासस्थानी नाना पाटेकर यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे 45 मिनिटे नानांचा सीपीआर देण्यात आला, पण अखेर
पहाटे 5.20 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
शासकीय इतमामात अंतिम निरोप
महाराष्ट्र शासनाने नाना पाटेकर यांच्या चित्रपट आणि सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग योगदानाची दखल घेत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची घोषणा केली होती. गोव्याहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव पुणे विमानतळावर आणण्यात आले. विमानतळावर आणि त्यानंतर डोणजे गावात पोलिस दलाच्या तुकडीने त्यांना बिगुल वाजवून आणि हवेत फैरी झाडून मानवंदना (गार्ड ऑफ ऑनर) दिली.
दिग्गजांची उपस्थिती
नाना पाटेकर यांच्या अंतिम दर्शनासाठी डोणजे येथील त्यांच्या फार्महाउसवर नागरिकांनी व चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत, माधुरी मिसाळ, सुनील तटकरे आदी नेतेमंडळींनी पुष्पचक्र अर्पण करून नाना पाटेकरांना मानवंदना वाहिली.
चित्रपट व सामाजिक क्षेत्राची हानी
आपल्या आक्रमक व प्रभावी अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार्या नाना पाटेकर यांनी परिंदा, क्रांतिवीर, तिरंगा, अग्निसाक्षी आणि वेलकम यांसारख्या अनेक चित्रपटांतून अजरामर भूमिका साकारल्या. अभिनयासोबतच नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी मोठे सामाजिक कार्य केले. त्यांच्या निधनाने भारतीय कला व सामाजिक विश्वावर शोककळा पसरली असून विविध स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.
सकाळी नऊ वाजल्यापासूनच अधिकारी आणि कर्मचारी परिसरात दाखल झाले होते. एकीकडे अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना दुसरीकडे नानांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या चाहत्यांची पावले सिंहगडाच्या दिशेने वळू लागली होती. त्यामुळे पायगुडेवाडी परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल, हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार अर्चना निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. जे. पाटील यांच्यासह प्रमुख अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. गिल्ल यांनी अंत्यसंस्काराचे ठिकाण पाहून पुढील तयारीबाबत अधिकार्यांना सूचना दिल्या.
अंत्यसंस्कार होणार असलेल्या जागेची साफसफाई तसेच परिसराची व्यवस्था प्रशासनाने हाती घेतली. जेसीबी, ट्रॅक्टर, रोलर आणि कामगारांच्या मदतीने जागा तयार करण्यात आली. काही तासांतच अंत्यसंस्कारासाठी आवश्यक व्यवस्था उभी राहू लागली होती.
दरम्यान, नानांच्या अंतिम दर्शनासाठी सकाळपासूनच परिसरात चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. पुणे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांतून नानांवर प्रेम करणारे नागरिक डोणजेच्या दिशेने येत होते. ज्यांच्या अभिनयाने अनेक पिढ्यांना हसवले, रडवले आणि अंतर्मुख केले, त्या आपल्या लाडक्या नानांना अखेरचा निरोप देण्यासाठी प्रत्येक जण आतुर झाला होता.
सकाळपासून पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने खडकवासला गावाच्या पुढील गोर्हे बुद्रुक डोणजे पायगुडेवाडी पर्यंत सर्व रस्ते आणि परिसर स्वच्छ केला होता. पीएमआरडीएचे कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थिव अंत्यदर्शन घेतले. त्यापूर्वी मुख्यमंत्री म्हणाले की, ज्येष्ठ अभिनेते आणि माझे स्नेही, मित्र, मार्गदर्शक नाना पाटेकर यांचे पार्थिव आज पुण्यात स्वीकारले. राज्य सरकारतर्फे त्यांना यावेळी मानवंदना देण्यात आली. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत पुष्पचक्र अर्पण करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. एक हरहुन्नरी कलावंताला अखेरची मानवंदना देताना, श्रद्धांजली अर्पण करताना मन भरून आले होते. ज्येष्ठ अभिनेते आणि माझे स्नेही, मित्र, मार्गदर्शक नाना पाटेकर यांचे पार्थिव आज पुण्यात स्वीकारले. राज्य सरकारतर्फे त्यांना यावेळी मानवंदना देण्यात आली. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत पुष्पचक्र अर्पण करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
त्यांच्या बहुआयामी कारकिर्दीने आणि समाजकल्याणाच्या निःस्वार्थ वचनबद्धतेने एक न भरून येणारा वारसा मागे सोडला आहे.
– राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूकाही मोजक्या कलाकारांकडे नाना पाटेकर यांच्यासारखी तीव्रता आणि वेगळेपण होते. त्यांनी प्रत्येक भूमिकेत अचाट वैविध्य आणले. ते त्यांच्या स्पष्ट आणि रोखठोक मतांसाठीही आदरणीय होते. हिंदी आणि मराठी सिनेमातील त्यांचे योगदान अफाट आहे.
– पंतप्रधान नरेंद्र मोदीपडद्यावर जेवढे भव्य होते, तेवढेच मनानेही मोठे होते. क्रांतिवीर ते नटसम्राटपर्यंत त्यांनी अभिनयाचा जो वस्त्रपट विणला त्याला तोड नाही. निर्भीडता ही त्यांची ओळख होती. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकर्यांसाठी ते कायम पुढे असायचे. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘Natsamrat’ is no more!