मुंबई :
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून शासनाच्या सवलतीत प्रवास करणार्या महिला व 65 ते 75 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 सप्टेंबर 2026 पासून राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयानुसार सवलतीचे तिकीट आता एनसीएमसी कार्डद्वारेच दिले जाणार आहे. दरम्यान, आतापर्यंत एक कोटी 11 लाख 78 हजार 90 प्रवाशांनी एनसीएमसी कार्डची नोंदणी केली आहे.
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, शासनाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणार्या प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरणाचे काम सुरू असून, त्यासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या महिला व ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी सुरू आहे. पुढील टप्प्यात इतर सवलतधारक प्रवाशांनाही ही सुविधा दिली जाईल.सवलतीचा लाभ 1 सप्टेंबरपासून घेण्यासाठी प्रवाशांनी एनसीएमसी कार्ड सोबत बाळगणे व त्यात आवश्यक रक्कम ‘टॉप-अप’ करून ठेवणे बंधनकारक आहे. यासंदर्भातील मानक कार्यप्रणाली (एसओपी) सर्व आगारांना पाठविण्यात आली आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांनी 1 सप्टेंबरपूर्वी जवळच्या एसटी आगारात जाऊन एनसीएमसी कार्डची नोंदणी, वितरण व ‘टॉप-अप’ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन महामंडळाने केले आहे. 75 वर्षांवरील ‘अमृत ज्येष्ठ नागरिकां’साठी एनसीएमसी कार्ड सक्तीला तात्पुरती मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांचे हाताचे ठसे उमटत नसल्याने नोंदणी प्रक्रियेत अडचणी
येत आहेत.
NCMC card mandatory for women and senior citizens on ST buses starting today.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…