जिल्ह्यातील प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध; मतदारसंख्या 40.76 लाखांवर
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) अंतर्गत प्रारूप मतदारयादी सोमवारी (दि. 31) प्रसिद्ध करण्यात आली. या पुनरीक्षणामुळे जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या 51 लाख 4 हजार 458 वरून 40 लाख 76 हजार 666 इतकी झाली आहे.
पुनरीक्षणादरम्यान तब्बल दहा लाख 27 हजार 894 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यात कायमस्वरूपी स्थलांतरित, मृत व्यक्ती, दुबार नोंदणी झालेले तसेच शोध न लागलेल्या मतदारांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई यांनी दिली.
एसआयआर प्रक्रियेत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक एक लाख 93 हजार 236, तर नाशिक पूर्वमध्ये एक लाख 60 हजार 590 नावे वगळण्यात आली आहेत.
नाशिक मध्य मतदारसंघात एक लाख 20 हजार 790 नावे कमी झाली आहेत. मालेगाव बाह्य मतदारसंघातील मतदारसंख्या तीन लाख 89 हजार 788 वरून तीन लाख 21 हजार 112 झाली असून, 68 हजार 676 नावे वगळण्यात आली. मालेगाव मध्य मतदारसंघात 74 हजार651, तर नांदगाव मतदारसंघात 44 हजार 760 नावे वगळण्यात आली आहेत. एसआयआर सोबतच जिल्ह्यातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार मतदान केंद्रांची संख्या 4 हजार 919 वरून 4 हजार 958 करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 1200 मतदार असण्याची मर्यादा लक्षात घेऊन ही पुनर्रचना करण्यात आली आहे.
दावे, हरकतींसाठी महिनाभराची संधी
प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना दावे व हरकती दाखल करण्यासाठी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 असा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत प्राप्त दावे, हरकतींची सुनावणी करून 29 ऑक्टोबरपर्यंत त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
नवमतदारांनाही नोंदणीची संधी
या पुनरीक्षणासाठी 1 ऑक्टोबर 2026 हा पात्रता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. 18 वर्षे पूर्ण झालेल्या पात्र भारतीय नागरिकांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार असून नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म 6, नावाबाबत हरकत अथवा वगळणीसाठी फॉर्म 7, तर पत्ता बदल, तपशीलातील दुरुस्ती किंवा दिव्यांगत्वाची नोंद करण्यासाठी फॉर्म 8 भरता येणार आहे. त्याचप्रमाणे वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, भारतीय पासपोर्ट तसेच दहावी किंवा बारावीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. प्रारूप यादीत आपले नाव आहे की नाही, याची नागरिकांनी तपासणी करावी. नाव वगळले असल्यास किंवा मतदार यादीतील तपशीलात काही त्रुटी असल्यास 30 सप्टेंबरपूर्वी दावा अथवा हरकत दाखल करावी, नागरिकांना मतदान केंद्रावर तसेच मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या संकेतस्थळावरून प्रारूप मतदार यादी तपासता येणार आहे. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यास पात्र मतदारांचे नाव अंतिम यादीत सामाविष्ट होऊ शकेल.
– आयुष प्रसाद , जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ,नाशिक
The names of 1,027,000 voters were removed following the SIR.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…