नाशिक

सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे जोडे मारो आंदोलन

सिन्नर : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टचे पडसाद सिन्नरमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. यावेळी घोषणाबाजी करत संबंधितांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
आंदोलनात सहभागी झालेल्या पदाधिकार्‍यांनी महिला नेत्या आणि संवैधानिक पदावरील व्यक्तीबाबत आक्षेपार्ह भाषा वापरणे निषेधार्ह असल्याचे सांगितले. राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक स्तरावर अशा प्रकारचे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले. अशा प्रकारांना कायदेशीर उत्तर देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आली.
या आंदोलनात नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुभाष कुंभार, आरोग्य सभापती ललिता हांडे, शिक्षण व क्रीडा सभापती कांताताई जाधव, नगरसेवक अ‍ॅड. पंकज जाधव, शेखर गोळेसर, सुदर्शन नाईक, विलास जाधव, विजय वरंदळ, सुनील गवळी, दत्ता हांडे, हरी वरंदळ, किरण गोजरे, बाळासाहेब कामानकर, बापू गोजरे, रवींद्र मोगल, योगानंद गवळी, ज्ञानेश्वर उबाळे, अनिल गायकवाड, संजय नवसे, समर्थ उगले, सचिन मचकुले आणि ऋषी भोर यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनाच्या शेवटी संबंधित पोस्टचा निषेध नोंदवून अशा प्रकारच्या वक्तव्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

NCP stages ‘shoe-beating’ protest in Sinnar over offensive post against Sunetra Pawar.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चहाच्या पिशव्यांमधून सूक्ष्म प्लास्टिकचे कण!

- डॉ. किशोर पवार उकळत्या पाण्यात केवळ तीन मिनिटे ठेवलेल्या चहाच्या पिशवीतून (टी बॅग) सुमारे…

11 hours ago

ताम्रपटातील प्राचीन नाशिक

- रमेश पडवळ - चेतन राजापूरकर नाशिकचा प्राचीन इतिहास केवळ मंदिरे, लेणी आणि शिलालेखांपुरता मर्यादित…

12 hours ago

महागाईचे विष!

- सीमाताई मराठे अर्थशास्त्र हे केवळ आकड्यांचे खेळ नसते, तर ते सामान्य माणसाच्या ताटातील भाकरीचे…

12 hours ago

सोनिया गांधींचे पुस्तक यशस्वी

- राजेश शिरभाते काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष, खासदार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी, इंदिरा…

12 hours ago

दिवाळी संपली; पुढे काय?

- अशोक थोरात दुष्काळ, जीवघेणी महागाई यात दिवाळी तर संपली, पण पुढील सहा महिने सर्वांनाच…

12 hours ago

विद्यार्थी : समाजाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार

विद्यार्थी हा कोणत्याही राष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक विकासाचा महत्त्वपूर्ण आधार असतो. राष्ट्राचे भविष्य…

12 hours ago