नाशिक

चाकणकर यांना पदावरून हटवण्याची राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांकडून मागणी

नाशिक : प्रतिनिधी
महिलांचे लैंगिक शोषण करणार्‍या कॅप्टन अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अजित पवार गट) प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे रूपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून तत्काळ हटवावे, अशी जोरदार मागणी नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांना पाठविलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे. कॅप्टन अशोक खरात प्रकरणात चाकणकर यांचा कथित सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नाशिक तालुकाध्यक्ष शीतल भोर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणामुळे पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून, कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी आहे. चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मानसिकता राहिलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाचे समानता व न्यायाचे तत्त्व धोक्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्हाभरातील महिला पदाधिकार्‍यांनीही एकमुखी भूमिका घेत, चाकणकर यांच्यावर तत्काळ कारवाई न झाल्यास कामकाज करणे कठीण होईल, असा इशारा दिला आहे. भगूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, उपाध्यक्ष कल्पना शिरसाठ, वैशाली जाधव, सरचिटणीस ज्योती सावकार-वाकचौरे, जयश्री केदार, वर्षा लिंगायत, चिटणीस मंगल नागरे, चंद्रकला बुरडे, मंजूषा महेश, सचिव संघटक प्रतीक्षा खत्री, पद्मा पवारे यांसह अनेक पदाधिकार्‍यांनी निवेदन दिले आहे.
जिल्हा सदस्य आरती भोंडवे, जिल्हा सचिव प्रेमलता राजगुरू, तालुकाध्यक्षांत सपना पगार, अनिता काळे, सुरेखा नागरे, राजश्री पहिलवान, आशा थोरात, आशा देवरे, भारती खिरारी, प्रतिभा खैरनार, तुमी सोनवणे, अपर्णा देशमुख, वनिता शिंदे, संगीता राऊत, पूनम गवळी यांचा समावेश आहे. देवळाली कॅम्प शहराध्यक्ष सायराबानो अब्दुल शेख यांनीही स्वतंत्र निवेदन देत, या प्रकरणामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी कठोर निर्णय आवश्यक आहे, असे म्हटले आहे.
त्यांच्यासोबत आशा बागूल, सुनील बैंडे, रंजना सैथा, आयशा शेख यांसह कार्यकर्त्यांनी समर्थन दर्शवले आहे. संबंधित प्रकरणामुळे नाशिकसह राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पक्षनेतृत्व यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

NCP women activists demand removal of Chakankar from post

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मालेगावात प्रतिबंधित औषधांचा साठा जप्त

तिघांना अटक; 67 हजार अल्प्राझोलम गोळ्या, कोडीन सिरप मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ…

2 minutes ago

तरुणाचा आयफोनचा हट्ट; संभाजीनगरात संपले कुटुंब!

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज-तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक…

7 minutes ago

राज्यातील पोलीस ठाण्यांच्या रचनेत मोठे बदल

सध्याचे मनुष्यबळ 1960 च्या निकषांवर आधारित; गुन्ह्यांच्या संख्येनुसार पोलीस ठाण्याचा गट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील…

18 minutes ago

‘पॅलेट गन’प्रकरणी गुन्हा दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला यश नवी दिल्ली : प्रतिनिधी ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन…

29 minutes ago

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

20 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

20 hours ago