नाशिक

राष्ट्रवादीच्या धरणे आंदोलनाला यश, घरपट्टी वाढीला स्थगिती

वावी : वार्ताहर
कोपरगाव नगरपरिषदेने केलेल्या अवाजवी वाढीव घरपट्टी व नगरपरिषदेच्या इतर चुकीच्या निर्णयांविरोधात कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मागर्दर्शनाखाली सोमवारपासून कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक याठिकाणी सुरू करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला यश आले आहे.
सर्वसाधारण सभेत घरपट्टी वाढीच्या प्रस्तावावर निर्णय होत नाही तोपर्यंत कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून घरपट्टी वाढीला तूर्तास स्थगिती देण्यात आली असल्याचे कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांनी लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्यावर वाढीव दराने घरपट्टी (मालमत्ता कर) आकारण्यात येवून मालमत्ताधारकांना अधिकृत पावत्या देखील वाटप करण्यात आल्या होत्या. केलेली वाढ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही अवाजवी केलेली वाढ कोपरगावकरांच्या खिशाला अजिबात परवडणारी नव्हती त्यामुळे नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. परंतु या चुकीच्या घरपट्टी (मालमत्ता कर) वाढी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने आवाज उठवून ही करवाढ मागे घ्यावी, अशी लेखी मागणी केली होती. सर्वसाधारण सभेत घरपट्टी वाढीच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिकांना वाढीव घरपट्टीच्या पावत्या वितरित केल्या जाणार नाहीत.

NCP’s sit-in protest succeeds; hike in property tax stayed.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago