सिन्नर : प्रतिनिधी
मान्सूनने दमदार आगमन केल्यानंतर मंगळवारीही सिन्नर तालुक्यात पावसाची संततधार कायम राहिली. सिन्नर शहरासह तालुक्याच्या बहुतांश भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतीकामांनाही वेग आला आहे.
सिन्नर शहरात सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. दुपारपर्यंत अधूनमधून पाऊस पडत राहिला. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर दुपारनंतर पुन्हा जोरदार सरी बरसल्या.
अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील भाजीपाला विक्रेते, व्यापारी तसेच खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. अनेकांनी पावसापासून बचावासाठी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला, तर काहीजण पावसाच्या सरी अंगावर घेत आपला प्रवास सुरू ठेवताना दिसले.
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ठाणगाव, भोजापूर खोरे परिसरातही पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सोमवारी पूर्व भागातील देवपूर-पंचाळे परिसरात दमदार पाऊस झाल्यानंतर मंगळवारीही या भागात जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचून लहान तलावांचे स्वरूप निर्माण झाले.
देवपूर-पंचाळे परिसरात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो लागवड करण्यात आली असून काही ठिकाणी नव्याने लावलेली रोपे पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसून आले. मात्र एकूणच पावसामुळे खरीप हंगामातील कामांना गती मिळाली असून बळीराजा सुखावल्याचे चित्र तालुकाभर पाहायला मिळत आहे.
Widespread rainfall across Sinnar taluka.
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…