हवाई वाहतुकीचे व्यापक जाळे विणण्यास सर्वांच्या सहकार्याची गरज- पांचाळ


नाशिक : प्रतिनिधी
नाशकातून देशात नियमित आणि विनाखंड विमान वाहतूक सुरु राहावी तसेच विदेशातही ही सेवा सुरू करण्याच्यादृष्टीने संबंधित सर्व यंत्रणा आणि संघटनांनी एकजुटीने प्रयत्न करावे तसेच त्यासाठी नाशिकचे ब्रँडिंग करावे,असे आवाहन आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी केले.
नाशकात विमानसेवा पुरविणार्‍या कंपन्यांसोबत यासेवेचे व्यापक जाळे येथे विणले जावे तसेच नाशकातून दिल्ली,मुंबई, हैदराबाद,चेन्नई, तिरुपती,अहमदाबाद,गोवा,नागपूर व अन्य शहरांशी एअर कनेक्टिव्हिटी कायमस्वरूपी व विनाखंड सुरू राहावी या संदर्भात फेब्रुवारीत बैठक होणार असून त्यात सादर करावयाच्या रोडमॅप संदर्भात चर्चा करण्यास विविध औद्योगिक आणि संलग्न संघटनांच्या पदाधिकारी आणि प्रतिनिधींची बैठक आयामाचयस रिक्रिएशन सेंटर येथे पार पडली त्यावेळी मार्गदर्शन करतांना निखिल पांचाळ बोलत होते.
निमाचे नूतन अध्यक्ष धनंजय बेळे,तानचे सागर वाघचौरे, मनोज वासवानी,क्रेडाईचे सचिन चव्हाण, कुणाल पाटील,नीटाचे ऋषिकेश वडाळकर नाशिक सिटीझन फोरमचे सचिन अहिरराव,चेंबरचे संजय सोनवणे,आयमाचे उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे,सहसचिव गोविन्द झा, खजिनदार राजेंद्र कोठावदे,एव्हीएशन कमिटीचे चेअरमन मनीष रावळ, ज्ञानेश देशपांडे, संदीप देसले, अमित कुलकर्णी आदी व्यासपीठावर होते.

नाशिकहून पूर्ण क्षमतेने देश आणि विदेशात विमानसेवेचे व्यापक जाळे विणले जावे यासाठी सर्व संघटनांनी,नागरिकांनी, तसेच व्यावसायिकांनी त्याचे ब्रँडिंग करावे,ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावून त्याची व्यापक प्रसिद्धी करावी.लोकांना विमानतळावर विनाविलंब आणि वेळेत पोहोचता यावेत यासाठी शहराच्या कानाकोपर्‍यातून बससेवेचे जाळेही विणले जावेत,असेही निखिल पांचाळ यांनी सांगितले.
विमान कंपन्यानी उत्तम सेवा दिल्यास नाशकातील सर्व संघटना त्या कंपन्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करतील,असे मत निमाचे नूतन अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केले.



Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago