नाशिक

शेजारील तालुके दुष्काळग्रस्त, मग दिंडोरी का नाही?

शेतकर्‍यांची व्यथा : ’हिरवा पाला’ दिसतोय, पण धान्याचा पत्ता नाही

दिंडोरी : प्रतिनिधी
शेजारील तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले असताना, दिंडोरी तालुक्याला या यादीतून वगळण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती पाहिल्यास वास्तव पूर्णपणे वेगळे असल्याचे दिसते. पाऊस झाला खरा, पण तो योग्य वेळी न बरसल्यामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिवाळा आहे.
दिंडोरी तालुका आज वरवर पाहता हिरवागार आणि सुजलाम् सुफलाम् दिसत असला, तरी या हिरव्यागार पाठीमागे शेतकर्‍यांच्या अफाट व्यथा दडलेल्या आहेत. योग्य वेळी पाऊस न झाल्याने अनेक पिकांना अपेक्षित धान्यच आलेले नाही. शेतात फक्त हिरवागार पाला दिसत असला तरी दाणा भरलेला नाही. यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता, प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची वस्तुस्थिती तपासावी, असा संतप्त सवाल केला जात आहे. दिंडोरी तालुक्यात सोयाबीन, भुईमूग, नागली यांसह भाजीपाला आणि टोमॅटोचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते; परंतु सध्या या शेतीमालाला बाजारपेठेत अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. विशेष म्हणजे, तालुक्यात मोठी धरणे असूनही त्या पाण्याचा शेतकर्‍यांना प्रत्यक्ष किती लाभ मिळतो, हा मोठा प्रश्न आहे. पिण्याच्या पाण्यासाठी साठा आरक्षित ठेवल्यास शेतीसाठी पाणी उपलब्धतेचे नियोजन कसे होणार? या चिंतेने शेतकरी ग्रासला आहे.

शासनाकडे तातडीने मदतीची मागणी

प्रशासनाने तळागाळातील शेतकर्‍यांची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. हिरवागार दिसणारा प्रत्येक शेतमाल बळीराजाला आर्थिक उत्पन्न मिळवून देईलच, असे नाही. खरी परिस्थिती समजण्यासाठी प्रशासनाला थेट बांधावर जावेच लागेल. त्यामुळे शासनाने तातडीने दखल घेऊन दिंडोरी तालुक्याचे नाव दुष्काळी यादीत समाविष्ट करावे, अशी आक्रमक मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे व तालुकाप्रमुख किशोर कदम यांनी केली आहे.

Neighboring talukas are drought-hit, so why isn’t Dindori?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

3 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

3 hours ago