निदा खानला इतक्या दिवसांची कोठडी
न्यायालयाने दिली ही सवलत
नाशिक: प्रतिनिधी
टीसीएस धर्मांतर प्रकरणातील प्रमुख संशयित निदा खानला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले असून, गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजी नगर येथून ताब्यात घेतले आहे. आज तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता 11 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, निदा खान ही 2 महिन्यांची गर्भवती असल्याचे प्रेग्नन्सी टेस्ट मध्ये समोर आल्याने तिला दररोज संध्याकाळी तिच्या आईला भेटण्याची सवलत देण्यात देण्यात आली आहे.
टीसीएस या बहुराष्ट्रीय कंपनीत धर्मांतराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या कंपनीत काम करणारी निदा खान चा यात सहभाग असल्याचे उघड झाले होते. मुंबई नाका पोलिसांनी कंपनीतील एच आर मॅनेजर चैनानी सह इतर सर्व सहभागी संशयित आरोपींना अटक केली होती. हे सर्व जण सध्या कोठडीत आहेत. परंतु निदा खान गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाली होती. तिने नाशिकरोड येथील न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. ती गर्भवती असल्याने तिला जामीन द्यावा, अशी याचिका निदा खान च्या वकिलांनी कोर्टात केली होती. त्यासाठी वकिलांची फौज उभी करण्यात आली होती. मात्र नाशिकरोड न्यायालयाने तिचा जामीन फेटाळून लावला होता, त्यामुळे तिच्यावर अटकेची टांगती तलवार कायम होती. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या निदा खान च्या कुटुंबाची मध्यंतरी माजी खासदार इम्तियाज जमील यांनी भेट घेऊन तिच्या पाठीशी राहण्याचा शब्द दिला होता तर निदा खान पोलिसांना चकमा देत असल्याने तिच्या शोधासाठी तीन वेगवेगळे पथके तैनात करण्यात आले होते. मध्यंतरी मुंब्रा येथून तिच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली होती. मात्र तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. तथापि, ती छत्रपती संभाजीनगर येथे असल्याचे देवळाली कॅम्प पोलिसांना समजताच गुन्हे शाखा आणि देवळाली कॅम्प पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छत्रपती संभाजी नगर येथून निदा खान ला ताब्यात घेण्यात यश मिळवले.
–///
तपासाला गती येणार
निदा खानवर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याशिवाय टीसीएस कंपनीत झालेल्या धर्मांतर प्रकरणात देखील तिचा हात असल्याचा तपासात उघड झाले आहे. निदा खान च्या अटकेमुळे आता या तपासाला वेग येणार असल्याचे बोलले जात आहे.
—
पोलीस करणार या गोष्टीचा तपास
निदा खान चा टीसीएस मधील धर्मांतर प्रकरणात नेमका कसा सहभाग होता, फरार झाल्यापासून ती कुठे होती, कुणाच्या संपर्कात होती, या काळात तिला कोणी मदत केली?या सर्व बाबींचा तपास पोलीस करण्याची शक्यता आहे.
नगरसेवक रडारवर
निदा खान हिला आश्रय देणाऱ्या एम आय एम नगरसेवक यालाही पोलिसांनी याप्रकरणी सह आरोपी करण्यात आले आहे. त्यालाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे.