१ जुलैपर्यंत हरकती घेता येणार महापालिकेची प्रारूप मतदार यादी उद्या जाहीर होणार
नाशिक : प्रतिनिधी : नाशिक महानगरपालिकेसह राज्यातील १४ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे . त्यानुसार प्रभागनिहाय उद्या ( दि . २३ ) गुरुवारी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत . मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर २३ जून ते १ जुलै या कालावधीत हरकती दाखल करता येणार आहेत .
राज्यातील नाशिकसह बृहन्मुंबई , ठाणे , नवी मुंबई , कल्याण डोंबिवली , उल्हासनगर , वसई विरार , पुणे , पिंपरी चिंचवड , सोलापूर , कोल्हापूर , अकोला , अमरावती व नागपूर या १४ मनपा निवडणुकीसाठी मतदार यादीच्या कार्यक्रमास व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी , अशा सूचना निवडणूक आयोगाने मनपा आयुक्तांना केल्या आहेत . मतदार याद्या प्रसिद्ध होत असताना याबाबत मतदारांना मोठ्या प्रमाणावर अवगत करणे आवश्यक आहे . भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत . त्यावरून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना नवीन नावांचा समावेश करणे , नावे वगळणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही . हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका , मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे , विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदीसंदर्भातील दुरुस्त्या करण्यात येतात . याबाबत मतदारांना माहिती होणे आवश्यक आहे . ही पार्श्वभूमी लक्षात घेता प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमास व्यापक प्रसिद्धी द्यावी , असेही आयोगाने म्हटले आहे . गेल्या काही दिवसांपासून नाशिक महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर पुढे महिला आरक्षण सोडत व आता मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत . या मतदार याद्यांमध्ये माजी नगरसेवक , पदाधिकाऱ्यांना आपल्या प्रभागातील मतदारांची नावे समजणार असून , त्या दृष्टीने त्यांना तयारी करता येणार आहे .
महापालिकेची प्रारूप मतदार यादी उद्या प्रसिद्ध होणार आहे . आयोगाकडून मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी सूचना आलेल्या आहेत . प्रभागनिहाय जाहीर होणाऱ्या याद्यांत हरकती घेण्याची १ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे . मनोज घोडे – पाटील , उपायुक्त , प्रशासन
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…