नाशिक

कुंभमेळ्यात खासगी वाहनांना शहरात नो एन्ट्री

72 वाहनतळांचे नियोजन

तीन हजार एसटी बसेसची शटल सेवा

♦ कुंभमेळा पार्किंग आराखडा
♦ नाशिकमध्ये 46 वाहनतळांचे नियोजन.
♦ त्र्यंबकेश्वरमध्ये 26 वाहनतळ प्रस्तावित.
♦ एकूण 72 वाहनतळांची व्यवस्था.
♦ सुमारे 3 लाख वाहनांची क्षमता.
♦ आउटर, आउटर-1 आणि इनर अशी तीनस्तरीय पार्किंग व्यवस्था.
♦ अमृत स्नानाच्या दिवशी मुख्य शहर परिसरात खासगी वाहनांना प्रवेश नाही.
♦ घाट परिसरापर्यंत एसटी बसेसद्वारे विशेष शटल सेवा.
♦ गर्दीच्या काळात सुमारे 3 हजार बसेस तैनात करण्याचे नियोजन.
♦ वाहनतळांवर मूलभूत सुविधा आणि सुरक्षाव्यवस्था उपलब्ध.

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा-2027 मध्ये अमृत स्नानाच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने वाहतूक व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अमृत स्नानाच्या पर्वणीच्या दिवशी खासगी वाहनांना नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या मुख्य शहर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. ही वाहने शहराबाहेरील नियोजित वाहनतळांवर उभी करावी लागणार आहेत. तेथून भाविकांना विशेष बससेवेद्वारे घाट परिसरापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कुंभमेळ्यासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दाखल होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळणे, आपत्कालीन सेवांना अखंड मार्ग उपलब्ध करून देणे आणि भाविकांचा प्रवास अधिक सुलभ करणे, या उद्देशाने तीनस्तरीय पार्किंग व्यवस्थेचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
प्राधिकरणाच्या नियोजनानुसार नाशिक शहर परिसरात 888 हेक्टर क्षेत्रावर 46 वाहनतळ विकसित करण्यात येणार आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये 671 हेक्टर क्षेत्रावर 26 वाहनतळांची उभारणी केली जाणार आहे. या सर्व वाहनतळांची एकत्रित क्षमता सुमारे तीन लाख वाहनांची असेल. भाविकांची संख्या आणि प्रत्यक्ष परिस्थितीनुसार या नियोजनात आवश्यक ते बदल करण्याची मुभा ठेवण्यात आली आहे.
या व्यवस्थेत आउटर पार्किंग, आउटर-1 पार्किंग आणि इनर पार्किंग असे तीन स्तर असतील. शहराकडे येणार्‍या प्रमुख मार्गांवर पहिल्या टप्प्यात वाहनांचे नियोजन आउटर पार्किंगमध्ये केले जाईल. दुसर्‍या स्तरावरील आउटर-1 पार्किंग वाहतुकीचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी बफर झोन म्हणून वापरले जाणार आहे. इनर पार्किंगपर्यंत भाविकांना एसटी महामंडळाच्या विशेष बससेवेद्वारे आणण्यात येईल. त्यानंतर घाट परिसरात पायी जाण्याची व्यवस्था असेल.
कुंभमेळा प्राधिकरणाने प्रत्येक वाहनतळावर दुचाकी, चारचाकी व बससाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवण्याचे नियोजन केले आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा, सुरक्षाव्यवस्था आणि माहिती केंद्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनतळांवरून घाट परिसरापर्यंतचा भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
सन 2015 च्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील अनुभवांचा अभ्यास करून यावेळी वाहतूक व्यवस्थेला अधिक तंत्रज्ञानाधारित आणि नियोजनबद्ध स्वरूप देण्यात आले आहे. मागील कुंभमेळ्यात काही ठिकाणी निर्माण झालेली वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या लक्षात घेऊन प्रमुख मार्गांलगत नव्या वाहनतळांची निवड करण्यात आली आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, अमृत स्नानासाठी दूरदूरवरून येणार्‍या भाविकांना वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात येत आहे. वाहन पार्क केल्यानंतर घाट परिसरापर्यंतचा प्रवास जलद, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्हावा, यासाठी विशेष बससेवा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. गर्दीच्या दिवशी बाह्य वाहनतळांपासून घाट परिसरापर्यंत सुमारे तीन हजार एसटी बसेसद्वारे शटल सेवा चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे खासगी वाहनांमुळे निर्माण होणारा वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

No entry for private vehicles in the city during the Kumbh Mela.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 days ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 days ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 days ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 days ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 days ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 days ago